बिलोली बस्थानकातील चोरांचा बंदोबस्त करा- अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा


लोकनेता न्यूज नेटवर्क

बिलोली | गौतम गावंडे :- बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस्थानक येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी प्रवाशांची मोबाईल, सोन्या, चांदीचे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला मारत आहे. चोरोंचा बंदोबस्त,सी.सी टीव्ही केमेरे शिफ्टींग करण्यात यावे सह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले . गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या मनात चोरांची मोठी भिती निर्माण झाली आहे. बसस्थानक परिसरात दुसऱ्या बाजुला बांधकाम सुरू असल्याने मोठी गर्दी एका बाजूला होत आहे. प्रवासी हातात बॅग घेऊन एसटीत चढताना मोबाईल दागिन्यांसह पैशांवर डल्ला मारला जात आहे. या भागातील पोलीस करतात तरी काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय. त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत . जुन्या ठिकाणावरुन कॅमेरे काढून नविन बसस्थानक येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे,बस्थानक येथे पोलीस कर्मचारी यांची सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ड्युटी लावण्यात यावे, प्रवाशी सतर्कते बद्दल रिकार्डींग आडीओ लावण्यात यावे.,प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी,चोरांचा बंदोबस्त करण्यात यावे,प्रवाशी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात यावी,चालु असलेले काम लवकर संपवून प्लॉट फार्म सुर करावे अदी मागणीचे निवेदन विभाग नियंत्रक नांदेड डॉ.चंद्रकांत वडस्कर व पोलीस निरीक्षक अतुल भोसले बिलोली , यांना लेखी तक्रार करण्यात आली. पंधरा दिवसांच्या आत मागणी पुर्ण न झाल्यास बस्थानक येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या वेळी निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज,शैबास पठाण अदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.

_____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in/

 

About Post Author

error: Content is protected !!