May 2, 2024

आष्टी नगर पंचायत कार्यालयाच्या वतीने मेरी माटी मेरा देश ह्या कार्यक्रमाचे आयोजन

लोकनेता न्यूज नेटवर्क

आष्टी/राजु म्हस्के :- आपल्या देशाची सुरक्षा या देशाचे जवान डोळ्यात तेल घालून 24 तास अविरतपणे करत असतात.याच जवानांचा देखील सन्मान व्हावा त्यांचे मनोबल वाढावे यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत काळात प्रत्येक गावागावात ज्या सैनिकांनी देशसेवा केली, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्याप्रती उतराई होण्याचा योग आपल्याला मिळत आहे. हे आपल्या सर्वांचे भाग्य असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले आहे.
         आष्टी नगर पंचायत कार्यालयाच्या वतीने मेरी माटी,मेरा देश ह्या कार्यक्रमाचे जिल्हा परिषद कन्या प्रशाळेत सोमवार दि.१४ रोजी सकाळी ११ वा. शिलाफलक अनावरण सोहळा,शहिद जवान यांच्या वीर पत्नीचा विशेष सन्मान सोहळा, माजी सैनिक सन्मान सोहळा, वृक्ष लागवड करून अमृतवाटीका निर्मिती व वसुधा वंदन,पंचप्रण शपथ सोहळाच्या कार्यक्रमात आ.धस बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पञकार अंनत हंबर्डे, आष्टी तहसिलदार प्रमोद गायकवाड,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.जयश्री शिंदे,वैद्यकीय अधिक्षक डाॅ.राहूल टेकाडे, व्यापारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय मेहेर,जैन श्रावण संघाचे तालुकाध्यक्ष सुखलाल मुथा,नगर पंचायतचे मुख्यधिकारी बाळदत्त मोरे,व्यापारी संघटनेचे आष्टी शहराध्यक्ष संपत शेळके, उपाध्यक्ष शहादुल्ला बेग,माजी सभापती बद्रीनाथ जगताप, संतोषशेठ मेहेर नगराध्यक्ष जिया बेग, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे,रंगनाथ धोंडे, मुर्शदपूर ग्रा.पं.सरपंच अशोक मुळे,माजी जि.प.सदस्य खंडूदादा जाधव,नवीन कासवा,विनोद रोडे, यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले, देशप्रेम

अधिक बळकट होण्यासाठी देशातील प्रत्येक घटकाला आणि प्रत्येक व्यक्तीला समोर ठेऊन जास्तीत जास्त समाज उपयोगी कार्य करण्यासाठी वारंवार आम्हाला प्रेरणा देण्याचे काम केले.केंद्र सरकारने सध्या राबविलेले उपक्रम म्हणजे प्रत्येक गावातील माती राजधानी दिल्ली येथे नेऊन त्यांची पूजा देशाचे पंतप्रधान करणार आहेत.हि बाब आपल्यासाठी अभिमानाची आहे. केलेल्या कामांचं कुणी तरी कौतुक करावं हिच आपेक्षा काम करणाराला असती आम्ही नगर पंचायतच्या माध्यमातून जि.प. कन्याशाळेत झाडे आणून दिले त्यांचा संभाळ शाळेने केला अन् त्यात सौदर्य फुलल्याचे यावेळी पहावयास मिळाले असेही धस म्हणाले. तर प्रा.अनंत हंबर्डे यांनी जे देशासाठी लढले त्यांना नमन करतो, ज्यांना या देशावर प्रेम नाही त्यांना येथे राहण्याचा अधिकार नाही. या भारत देशाला बलीदान देणा-या शूरवीरांची आपल्याकडे कमी नव्हती.हे सगळे शूरवीर हे आपल्या देशाच्या मातीवर प्रेम करत होते.आणि त्यांची आपल्याला जाणीव ठेवण्यासाठी असे कार्यक्रम घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगीतले.

        या कार्यक्रमास नगर पंचायतचे गटनेते किशोर झरेकर,बांधकाम सभापती शेख शरीफ,सभापती शाम वाल्हेकर,सभापती सुरेश आबा वारंगुळे,नगरसेवक सुनिल रेडेकर,भारत मुरकुटे, ईरषान खान, अक्षय धोंडे,अस्लम बेग,ज्ञानेश्वर राऊत, ज्योतिबा रेडेकर, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक खताळ, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यपक सुरेश पवार नगर पंचायतचे तपकिरे, प्रकाश हरकळ, अजिनाथ गिते यांच्यासह त्रिदल संघटनेचे आजी माजी सैनिक , व सर्व शिक्षक,अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्र संचलन बाळासाहेब तळेकर यांनी केले.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!