May 2, 2024

दोन हजाराच्या नोटांवरती बंदी; कारण ऐकून थक्क व्हाल

लोकनेता न्युज नेटवर्क

मुंबई :- नरेंद्र मोदी यांचे सरकार आलं नंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2017 मध्ये जुन्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटावर हे बंदी घालण्यात आली त्यावेळी नूतन दोन हजाराची नोट चलनात आणली होती. रिझर्व बॅँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय चलनातून 2000 रुपयांची नोट आता बंद केली जाणार आहे. नागरिकांकडे दोन हजारांची नोट असेल त्यांना बँकेत जावून चलनी नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत. सात वर्षानंतर ही नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय रिझर्व बँकेने घेतला आहे. 

    सप्टेबंर 2023 पर्यंत नारिकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचे आवाहन रिझर्व बॅँकेने केले आहे. सध्या ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते नागरिक त्यांच्याकडील नोटा कायदेशीर निविदा म्हणून वापरू शकतात.
       सन 2018-19 मध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती आणि त्यापैकी जवळपास 90 टक्के नोटा 2017 पूर्वी सिस्टममध्ये टाकल्या गेल्या होत्या. चलनी नोटांचे आयुष्य सर्वसाधारणपणे 5 वर्षांचे असते. त्यावेळी छापलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचे आयुष्य पाच वर्षांचे होत आले आहे, त्यामुळे या नोटांचे चलन व्यवहारातून थांबेल.

      रिझर्व बॅंकेने बॅँकांना ग्राहकांना 2 हजार रुपयांच्या नोटा देऊ नयेत असे म्हटले आहे, नागिरकांना 2 हजार रुपयांच्या नोटा बॅँकेतून बदलून घेता येणार आहेत. त्यासाठी रिझर्व बँकेने 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत नागरिक आपल्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेऊ शकतात. मात्र एका वेळी 20 हजार रुपये किंमतीच्या म्हणजेच 10 नोटा नागरिक बदलून घेऊ शकतात. अशी माहिती आरबीआयने दिलेली आहे. मात्र अचानकपणे २००० च्या नोटा बंद होण्याचे कारण काय असेल याची उत्सुकता भारतातील सर्व लोकांना लागलेली आहे. मात्र या नोटा बंद होण्याचे कारण काय आहे ते आरबीआय अद्याप स्पष्ट केलेले नाही.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!