May 8, 2024

अभिष्टचिंतन दिन (वाढदिवस) म्हणजे नवसंकल्प दिवस !

लोकनेता न्युज नेटवर्क

      एक काळ असा होता की; ज्याचा त्याला सुद्धा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस माहिती नसायचा. समस्या, अडचणी, कामंच एवढी असायची, त्यामुळे वाढदिवस हा विषयच नसायचा. एखाद्या महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी एवढंच काय ते माहित व्हायचं! कोणताही विशेष दिवस साजरा न करता सगळे आनंदी असायचे. लेकरं-बाळ-माणसांनी घर, गुराढोरांनी गोठा, भाकरींनी टोपलं भरलेलं असायचं. परंतु अलीकडच्या दहा-वीस वर्षात सगळं काही झपाट्यानं बदललं. उत्पन्न वाढलं. माणसं विखुरली. गुरं-ढोरं-गोठा गायब झाला. घरातली पोथी-पारावरचं भजन बंद झालं! कुटुंब विभक्त होऊन घरातील बुजुर्ग माणसं गायब झाली. माणसांची जागा वेगवेगळ्या साधनांनी घेतली. टेलिफोन, रेडीओ, कृष्णधवल टीव्ही, रंगीत टीव्ही असे बदल होत होत साधा मोबाईल अन शेवटी कळस म्हणजे इंटरनेटसह स्क्रीन टच अँड्रॉइड मोबाईल आला आणि सगळच बदललं! ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ ने सगळीकडे हाहा:कार माजवला. माणसातला  माणूस उठून गेला. पत्र लिहिणारा, पुस्तक वाचणारा, माणसांत बसून हसत-खेळत गप्पा मारणारा, मैदानावर खेळ खेळणारा, निवांत वेळ काढून नातेवाईकांकडे जाऊन राहणारा स्वछंदी-आनंदी-मुक्त माणूस बंदिस्त झाला. एकाकी झाला. तासंतास एकटाच मोबाईल नावाच्या निर्जीव यंत्रांशी खेळू लागला. मोबाईलवरील फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम इत्यादी विविध एप्सने माणूस आणखीच एकटा झाला. माणसाने निर्माण केलेला मोबाईल माणसाला हाताळायला लागला आणि सुरु झाला मेसेज, चॅटिंगचा जीवघेणा खेळ! इथेच माणसांचा आणि माणसांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा जन्म झाला!

मी  हा लेख का लिहितोय? 

   त्याचेही कारण आज १ मे, माझा पक्का माहित नसलेला, गुरुजींनी त्यांच्या सोयीने टाकलेला वाढदिवस आणि उद्या आम्हाला (मी व माझी पत्नी सौ.विमल) पक्का माहित असलेला लग्नाचा वाढदिवस! वाढदिवस म्हणजे तरी काय हो? नवीन कपडे, केक, नाश्ता, जेवण, सेलिब्रेशन करणे म्हणजे वाढदिवस का? याचा अर्थ आपण सेलिब्रेशन करूच नये असे पण नाही, परंतु सेलिब्रेशन कशासाठी? आपण साजरा करतो आहोत तो वाढदिवस की घट दिवस? आजच्या दिवशी आपण सेलिब्रेशन शिवाय काय करायला हवे? असे एक ना अनेक प्रश्न पडतात. वाढदिवसाच्या संबंधाने मला अग्निसाक्षी चित्रपटातील नाना पाटेकरांचा एक मजेशीर डायलॉग आठवतो. वाढदिवसाची पार्टी, गोंधळ-गोंगाट सुरु असतो, त्या दरम्यान नाना येतो आणि सुरु असलेले लाउडस्पीकर पिस्तुलातील गोळी झाडून बंद करतो आणि म्हणतो, “जनम दिन मना रहे हो, अछी बात है. मगर इतना शोर क्यों मचा रहे हो भाई? ऐसा क्या तीर मारा है आपने पिछले ३६५ दिनों में?” अत्यंत महत्वाचा डायलॉग वाटतो हा. आपण वाढदिवस नाही तर घट दिवस साजरा करत असतो! एक महत्वपूर्ण वर्ष, मिळालेल्या सुंदर, अलौकिक जीवनातील ३६५ दिवसाचा एक टप्पा पार करून आपण पुढे आलो आहोत! या मागील ३६५ दिवसांत आपण असे कोणते महत्वपूर्ण कार्य किंवा उपक्रम केले? आपल्याकडून समाजाची, देशाची, साहित्याची अथवा अन्य काही सेवा घडली का? आपण या अगोदरच्या वर्षापेक्षा या वर्षात काय काय नवीन कार्य केले? आपल्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत या ३६५ दिवसांत कोणते संकल्प केले होते आणि त्यापैकी किती संकल्प आपण तडीस नेले? असे एक ना अनेक संकल्प अथवा कार्य आपण केले याचा लेखाजोखा अथवा आढावा घेणे म्हणजेच खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करण्यास समर्थ होणे होय!

      सगळीकडे वाढदिवस-एनिव्हर्सरीची धामधूम सुरु आहे. मिडीयावर सगळीकडे वाढदिवस आणि एनिव्हर्सरीचे पोस्टर्स झळकत असतात. सर्वत्र शुभेच्छाचा वर्षाव सुरु आहे. निश्चितपणे ही आनंदाची बाब आहे. मात्र त्यामागील विचार आणि आचार सुद्धा समाजाने समजून घेणे गरजेचे वाटते. सगळीकडे साधनाची रेलचेल असतांना एखादे सेलिब्रेशन करण्याच्या नादात आपण व्यसन, अनावश्यक फॅशन आणि खर्चाचे बळी तर पडत नाहीत ना? वाढदिवस नावाखाली युवा पिढी वाममार्गाला तर जात नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न पडताहेत. आज युवा पिढी जागृत होणे काळाची गरज आहे. सगळीकडे युवकांचे बेधुंद तांडे झुंडी-झुंडीने वाढदिवस साजरे करत आहेत. व्यसन केले जात आहे. पार्ट्या झडताहेत. गरीब घरची मुले देखील या पार्टी-उच्चभ्रू-उनाड संस्कृतीचे बळी ठरत आहेत. याला कुठेतरी आळा बसने अत्यावश्यक वाटते. हे प्रमाण कमी होऊन युवकांनी आपला वाढदिवस काहीतरी नवे संकल्प करून अथवा काहीतरी नवनिर्मितीची शपथ घेऊन साजरा करायला हवा!

            बंधू-भगिनीनो, आपल्या अनमोल जीवनातील एकएक दिवस आपण कमी करत आहोत. एकएक दिवस आपण मृत्युच्या जवळ जात आहोत. त्यासाठी आपल्याला मिळालेला अनमोल मानवदेह, आयुष्य आपण स्वतःचे उत्थान करून घेण्यासाठी उपयोगात आणावा लागेल! याच अनुषंगाने जगद्गुरू तुकोबाराय एका अभंगात लिहितात,

घडीघडी काळ वाट त्याची पाहे । अजुनी किती आहे अवकाश ।।

हाची अनुताप घेऊनि सावध । काही तरी बोध करी मना ।।

      याचा नक्की विचार झाला पाहिजे. आज वाढदिवस वेड एवढे वाढले आहे की; काही पैसेवाले, एखाद्या पदावर असलेली माणसे लोकांना प्रलोभन दाखवून लेख लिहून घेत आहेत. काहीतरी सामाजिक-राजकीय-शैक्षणिक-साहित्यिक-सांस्कृतिक योगदान असल्याशिवाय लेख लिहून घेणे अथवा लिहिणे म्हणजे एकप्रकारची भाटगिरी करून घेणे अथवा करणे होय! हे सुद्धा कुठेतरी थांबले पाहिजे.

     आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मीच हा लेख लिहित आहे. मागील वाढदिवशी मी विविध विषयांवर ५० लेख लिहायचा, केवळ जाण्यायेण्याच्या खर्चात, विनामुल्य १० ते २० व्याख्याने आणि १० ते २० कीर्तने करण्याचा संकल्प केला होता आणि तो जवळपास मी पूर्ण केला आहे. मागील वर्षात मी ५० पेक्षा जास्त लेख लिहून २० पेक्षा अधिक व्याख्याने-कीर्तने केली आहेत. असे असले तरी आज रोजी माझ्या वयाची ४८ वर्षे संपली आहेत आणि मी ४९ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. अनेक आप्तेष्ट, सहकारी, मित्र, विद्यार्थी, वाचक, लेखक, हितचिंतक मला आज शुभेच्छा देतील, त्या शुभेच्छाचा मी विनम्रतापूर्वक स्विकार करतो. यानिमित्ताने मी अपना सर्वांचा शतशः ऋणी असून मी करत असलेले जे काही छोटेसे कार्य आहे ते असेच इमाने-इतबारे पुढे नेण्याची मी आपणांस ग्वाही देतो. त्याशिवाय मी वर्षभर लोकांना योग-प्राणायामाचे मोफत धडे देईन. मी माझे अध्ययन-अध्यापनाचे, शैक्षणिक काम निष्ठेने पार पाडीन! वर्षभर मी कुणाशीही वितुष्ट येईल असे वागणार नाही. शांत राहून शांततेचा प्रसार-प्रचार करीन. मी नियमित ध्यान-योग-प्राणायाम करून इतरांना त्या संदर्भाने प्रोत्साहन देईन! अशाप्रकारे नेहमी मी माझा भोवताल नित्य आनंदी-निरोगी-हसतमुख ठेवण्यासाठी प्रयत्नरत राहीन! त्याचप्रमाणे आपणही काहीतरी संकल्प करून आपण जीवनातील प्रसंग साजरे करावेत अशी सहृदयतापूर्वक विनंती करतो! शेवटी विनम्रपणे सर्वांप्रती मी माझे कृतज्ञ भाव प्रकट करतो! प्रणाम! धन्यवाद!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!