महामानवाच्या जयंती उत्सवात पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित रहावे- युवा जनशक्ती गृप कौडगांव
लोकनेता न्युज नेटवर्क
केज :- ज्ञानसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जातिच्या चौकटीत बांधून न ठेवता बाबासाहेबांची जयंती उत्सव हा सार्वजनिक स्वरूपात साजरा व्हावा हा विचार उराशी बाळगून संपूर्ण तयारी करणारे केज तालुक्यातील मौजे कौडगांव हे गावं काळाच्या ओघात परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
त्याला एक मुख्य कारण आहे गेली एक दशक गावामध्ये भीतीच दबावाचं आकसदायी राजकारणाचा प्रवाह वाहत होता आणि या राजकारणाच्या प्रवाहात भरडला जात होता गावातील सर्वसामान्य नागरिक, गावातील लोकांना सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठीची एकप्रकारची मुभाच नव्हती असं जाणिवपूर्वक नमूद करावेसे वाटते.
लोक भीतीपोटी सार्वजनिक कार्यक्रम करायचे नाहीत याचं मुख्य रोख जात होता गेली दहा वर्षे सत्ता भोगत असलेल्या राजकारण्यांना आणि त्यांच्या बगलबच्चांना त्याचं कारण असं की सत्ताधारी जरी बाहेरच्या तालुक्यांमध्ये किंवा दुसर्या जिल्ह्यामध्ये राहत असले तर त्यांची बगलबच्चे मात्र गावांमध्ये सतत भांडण लावून देण्याचे आणि गावातील लोकांना त्रास देण्याचे काम करायचे,माजी सत्ताधारी त्यावेळी सरपंचांच्या खुर्चीवर विराजमान असलेल्या सरपंच पती नेहमी बाहेरगावची ,परळी,केज,बीड शहरातील टवाळखोर गुंड प्रवृत्तीचे लोक आणून गावातील लोकांना मोगमी अर्वाच भाषेत धमाकून दहशत निर्माण करायचे ती दहशत निर्माण होऊन त्यातून गावामध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते लोक सार्वजनिक ठिकाणी जास्त थांबायचे नाहीत सार्वजनिक ठिकाणी जास्त वेळ न थांबता आपापले काम करण्यासाठी शेतात निघून जायचे पण म्हणतात ना काळाच्या ओघांत एक ना एक दिवस कोणालाही पडद्याआड व्हावंच लागतं व जणता त्यांना एक ना एक दिवस हिसका दाखवतच असते म्हणून 2023
च्या कौडगाव ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणूकीत या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमताने एकत्र येऊन माझी सत्ताधाऱ्यांना इंगा दाखवून त्यांना घरी बसवण्याचं काम या कौडगावतील सुज्ञ जनतेने केलं तरीही माजी सत्ताधाऱ्यांना पराभव पचनी पडलाच नाही मतदानाच्या दिवशी तर धिंगाना केलाच परंतू निकालानंतरही पोलिसांच्या उपस्थितीत शांतता पूर्ण विजयी मिरवणूकीत मिरवणूकीत सहभागी लोकांना शिविगाळ करून कुरापती काढण्याचं काम केलं होतं परंतू पुढील बाजूच्या व पोलिसांच्या सामंजस्य भूमिकेमुळे वाद पेटला नाही पण शेवटी जनतेने घरचा आहेर दिलाच हे खरे.
गावात भांडण तंटा नाही लोक गुण्यागोविंदाने नांदत असून वेगवेगळ्या कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी साजरे करून गावाचा एकोपा टिकून ठेवण्याचे काम येथील जनता करत आहे त्याचाच एक भाग म्हणून भव्य दिव्य ज्ञानसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जन्मोत्सव साजरा होत आहे आणि ह्याच जन्मोत्सवामधील कार्यक्रमांचा एक भाग म्हणून गावातील मुळ भुमिपुत्र असलेले परंतू विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत राहून आपलं समाजपयोगी योगदान देणार्या मान्यवरांचा नागरि सत्कार करून त्यांना प्रेरणा मिळावी अशाही कार्यक्रमाचं नियोजन दिनांक 26 एप्रिल रोजी करण्यात आले असून प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा नियोजन करून दुसर्या दिवशी सकाळी सार्वजनिक सामुदायिक बुद्धवंदना व ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार असून दुपारी भव्य मिरवणूक निघणार असून त्यानंतर स्नेहभोजनाच कार्यक्रम होऊन रात्री प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार आहे तरी या सदर आगळ्या वेगळ्या कार्यमाला पंचक्रोशीतील हजारो जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा जनशक्ती गृप यांच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट :- शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे विचार अभिप्रेत माणून त्या अभिप्रेत अशा समाजनिर्मितेच्या दिशेने सुरूवात करण्यासाठी आम्ही महामानवाचा जयंती उत्सव हा सार्वजनिक स्वरुपाचा साजरा करत आहोत.यात पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित रहावे असे मी आवाहन मी युवा जनशक्ती गृप कौडगांव यांच्या वतीने करत आहे.
_____________
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?