May 9, 2024

आष्टी तहसिलदारांची गाडी जळून खाक; पहाटे अडीच ची घटना

तहसीलदार गायकवाड व पोलिस निरीक्षक खेतमाळस, घटनास्थळी दाखल

लोकनेता न्यूज नेटवर्क

आष्टी(राजू म्हस्के) :- सध्या संपूर्ण राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षणासाठी सर्वत्र मराठा समाज आक्रमक भूमिका घेतांना दिसत असून, त्याच पार्श्वभूमीवर आष्टीचे तहसीलदार यांच्या गाडीला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारास अचानक आग लागली. या आगीत गाडीचे संपर्ण नुकसान झाले असून, हि आग अचानक लागली की लावली याचा पोलीस तपास सुरू असल्याचे आष्टी पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार दि. २९ राञी नेहमी प्रमाणे आष्टी तहसिलदार यांचे जुन्या तहसिलदार निवास समोर लावण्यात आले. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक या गाडीने पेट घेतला. घटनेची माहिती होताच तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक खेतमाळस यांना संपर्क करून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी नगराध्यक्ष जिया बेग यांनी आष्टी नगर पंचायतच्या अग्नीशामक गाडीला पाचारण करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली मात्र तहसिलदार यांची गाडी पूर्ण भस्मसात झाली आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे अंदोलन सुरू असून काल दि. २९ रोजी जालन्याचे तहसिलदार छाया पवार यांची गाडी अंदोलकांनी फोडून मराठयांनी आपला

 राग व्यक्त केला होता. मात्र आष्टी येथील तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या गाडीला आग लावली की, आग लागली याचा अजून तपास पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस करीत आहेत. घटनेची माहिती कळताच तातडीने घटनास्थळी तहसीलदार प्रमोद गायकवाड पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, नगराध्यक्ष जिया बेग यांची तातडीने धाव, अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली नगराध्यक्ष जिया बेग यांनी पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तोपर्यंत गाडी जळून खाक झाली असे समजते.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!