May 9, 2024

संघर्षाचे शिलेदार : लोकनेते गोपीनाथराव मुंढे Gopinathrao Mundhe saheb

लोकनेता न्युज नेटवर्क 

         3 जुन 2023 लोकनेते गोपीनाथराव मुंढे साहेबांचे 9 वे पुण्यस्मरण साहेबांना जाऊन 9 वर्ष उलटली तरी देखील साहेब आपल्यामधून गेलेत अस वाटत नाहीत. साहेब ते तमाम महाराष्ट्र वाशियांच्या मनात जीवंत आहे. आणि साहेबांनी निर्माण केलेल्या या अस्तित्वाला केव्हाही इजा पोहचणे शक्य नाही. महाराष्ट्राच्याच नाहीतर देशाच्या राजकारणात सन्मानाने घेतल्या जाणार नाव लोकनेते गोपीनाथराव मुंढे साहेब. सर्व प्रथम  सर्वांना एक प्रश्न पडत असेल मी जेव्हा 17 वर्षाचा होतो तेव्हा पासून मी अनेक वेळा साहेबांच्या जयंती पुण्यतिथि निम्मित लेख लिहले पण कुठेही स्वर्गीय हा शब्द मी वापरला नाही कारण असे की साहेब हे माझा साठी त्यांच्या विचाराने जीवंत आहे. मृत्यू हा अटळ आहे पण नियतीने जो घात केला ते दुख केव्हाही विसरता येणार नाही.

           3 जून 2014 ची सकाळ जून म्हणल की पावसाळ्याला सुरुवात होणार, विजा वार हा दिवस चांगलाच माझा आठणीत आहे. मी नेहमी प्रमाणे सकाळी सकाळी बिस्किट आणण्यासाठी दुकानात गेलो दुकाना समोर मानस उभी होती, पण येतांना त्यांच्या बोलण्याने माझ लक्ष वेधून घेतलं आणि मी इकल की साहेब गेलेत त्याच क्षणी डोळ्यांना धारा लागल्या. मी पळतच घरी गेलो आणि आई ला म्हणल आई मुंढे साहेबांच्या अपघात झाला आणि साहेब गेलेत. त्या वेळेस या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसत नव्हता कारण त्या वेळे मी केवळ 12 वर्षाचा होतो. आणि तेव्हा मोबाइल पण काहीच जणांकडे होते. पण अस असल तरी काहीच वेळात ही बातमी वार्‍या सारखी संपूर्ण देशभरात पोहचली. अचानक झाल तरी काय हे सगळ्याच्या डोक्यात विचार फिरू लागले त्या नंतर साहेबांना परळीला आणण्यात आल तेथे साहेबांवरअंत्यसंस्कार झाले. आणि 2-3 दिवस उलटत नाही तर निधनाचे वेगवेगळे कारण समोर येऊ लागले. पण या कारणांना काहीच तख्य नव्हते जनसामान्य माणसासाठी देव असलेले साहेब या जगातून गेले त्या नंतर हे निश्च राजकारणी शेतकर्‍यांना जगू देतील अस मला तेव्हाही वाटलं नव्हतं.

            नेता कसा असावा किंवा नेता काय असतो ते तुम्हाला साहेबांच्या जीवन प्रवासातून कळालेल आहेच. ज्या वेळेस राजकारण काय असत किंवा नेता काय असतो हे देखील मला कळत नव्हतं त्या वेळेस मी साहेबांना बोलताना बघितलं होत की “मी मोडेल पण वाकणार नाही, आणि मरेल पण झुकणार नाही” भगवानगडावरील दसरा मेळाव्यातील हे वाक्य मी इकल होत साहेबांची ती बोलण्याची शैली सर्वांना आपलास करणारी होती. पण त्या वेळेला मला कधी वाटलं नव्हतं की माझा आयुष्यातील साहेबांना बघितलेला शेवचा दिवस असेल. काही गोष्टी ह्या वेळ ठरवत असते पण आहे त्या आयुष्यात कस जगायच हे नक्कीच आपण ठरवू शकतो.

           साहेबांच्या जीवनावर बोलावं एवढेही आपण मोठे नाही. पण आजच्या तरुण पिढीला साहेब केवळ विचारात ठेवून नव्हे तर साहेबांनी ज्या शेतकर्‍यांसाठी आपल आयुष्य अर्पण केल त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर बोलण्यासाठी साहेबांचा आदर्श घ्यायला हवा. केवळ निश्च नेत्याच्या माघे फिरून त्यांना आपले माय बाप मानून आपल्या माय-बापाचे आयुष्य सुखी होणार नाही. करायचं तर लोकनेते मुंढे साहेबांचा आदर्श डोळ्या समोर ठेवा. कार्यकर्त्याला नेता करणारे महाराष्ट्रातील “आनंद दिघे व गोपीनाथ मुंढे हे  2 च नाव आहेत.

           मुंढे साहेबांनी संपूर्ण आयुष्य गोरगरीब जनतेसाठी समर्पित केल बीड जिल्हयामध्ये ऊसतोड कामगार हे बिकट परिस्थिति मध्ये न्याण माघणार तरी कोणाकडे पण साहेबांनी त्यांच्यासाठी अनेक वेळा आवाज उठवला. संघर्ष हा मनापासून असावा लागतो. आज सुद्धा एक वाक्य एकलेल मला आठवतय की मुंढे साहेबांचा शेतातील उस हा बेभाव विकत होता म्हणून तो शेतामध्ये तसाच उभा होता त्या वेळेस साहेब म्हणले होते की आज आपला उस कारखान्यावाले घेत नसले तर एक दिवस आपला ऊसाचा कारखाना असेल आज साहेब नसले तरी साहेबांचा आत्मा परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा आहे.

           साहेबांचा संघर्ष हा नेहमी मागासलेल्या समाजासाठी होता. राजकीय क्षेत्रात पक्षातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यान सोबत मैत्रीचे संबंध होते. साहेबांच्या आयुष्यात आलेला माणूस हा नेहमी साहेबांच्या विचारणी पेरित होऊन जायचा. साहेबांना राजकीय जीवनात प्रवास करतांना शून्यातून वरती याव लागलं. या मध्ये अनेक विरिधकांना साहेबांनी तोंड दिल, राजकारण म्हणल की विरोधक येतातच पण विरोधकांना आपलस करण हे नेहमी साहेबांच्या मनात असायचं. केवळ भाषणात बोलूनच नव्हे तर शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन साहेबांनी शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या. महाराष्ट्रातील जनतेला मायेने हाक देणारा एकमेव नेता म्हणजे मुंढे साहेब…

           2014 च्या निवडणुकीमध्ये साहेबांचे सरकार आले सहबांनी केंद्रीय ग्राम विकास मंत्री पदाची शपथ घेतली. आणि 3 जून ला परळी मध्ये भव्यदिव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण नियतीचा किल्ल्या ह्या आपल्या हातात नसतात. याच दिवशी साहेबांवर काळाने घाट केला. जनसामन्याचा नेता महाराष्ट्रवासीयांना सोडून गेला. महाराष्ट्रावर आलेले हे मोठे संकट होत. गोरगरिबांचा देव चोरला गेला. आज साहेब आमच्यात नसले तरी तुमच्या विचारांनी तुम्ही आमच्या सोबत आहे… इतिहास रचून सातासमुद्रापार गेलात साहेब….जातांना महाराष्ट्रातील प्रत्येक घरामधील देवा जवळ तूम्ही जागा निर्माण करून गेले..

साहेब…….

देऊन गेलात तुम्ही

आम्हा आभाळभर माया

त्याच आभाळभर मायेत

भासते तुमच्या शब्दाची छाया

साहेब सदैव आठवणीत…!!!

लोकनेते गोपीनाथराव मुंढे साहेबांच्या पुण्यस्मरणा निम्मित विनम्र अभिवादन….

  • ज्ञानेश्वर सुरेश बुधवत

मुख्यसंपादक दैनिक लोकनेता

मातृतीर्थ सिंदखेड राजा

9960209149

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!