अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा दया – दिलीप खरात

लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड :- बोंढार येथील अक्षय भालेराव या युवकाची जातीवादी समाजकंटकांनी निर्घृण हत्त्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ त्या युवकाच्या गावी जाऊन आरोपिंना फाशीची शिक्षा देण्यात यावी व रा रचहिलेले आरोपींना व घटनेच्या मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करून योग्य ती शिक्षा देण्याचे मागणी पोलीस अधीक्षक नांदेड व जिल्हाधिकारी नांदेड यांना भाई दिलीप खरात व सर्व भीमसैनिकांच्या वतीने करण्यात आली व अक्षय भैया यांच्या कुटुंबास सांत्वनपर भेट देऊन अक्षय भैयास अभिवादन करण्यात आले.

       तसेच सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्यांच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच तात्काळ 50 लाखाची मदत करावी वरील सर्व मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक नांदेड व जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले वरील सर्व मागण्या तात्काळ मान्य न केल्यास पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी नांदेड येथील स्थानिक प्रशासन जबाबदार राहील.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!