April 27, 2024

दोन किलो सोन्याच्या नाण्याचा मोह ; मास्तरीनबाईला चक्क साडे 9 लाखाचा चुना

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- पॉलिश केलेले नकली सोन्याची दोन किलो नाणे देऊन उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेच्या महिला शिक्षिकेची साडेनऊ लाखाची फसवणूक केल्याची घटना जऊळका शिवारात सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान घडली. यामुळे एकच खळबळ उडाली असून फसवणूक झालेल्या शिक्षिकेने किनगाव राजा पोलिसात तक्रार दिली असून पोलीस तीन आरोपीचा शोध घेत आहेत.
            याबाबत मिळालेली माहिती अशी की सिद्धार्थ नगर अणदूर तालुका तुळजापूर येथील रहिवासी असलेली उषाबाई विठोबा झाकडे या उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. त्या ठिकाणी टोपली मधे झाडांची रोपे विकणाऱ्या सचिन बनसोडे यांच्यासोबत सदर शिक्षकेची ओळख झाली, त्यावेळी त्याने आम्ही लोणार येथे राहत असून घराचा पाया खोदताना सोने सापडले आहे आणि ते स्वस्तात विकायचे आहे असे सांगून सदर शिक्षकेला सुलतानपूर येथे सोने बघण्यासाठी बोलवले.

      दिनांक 21 मार्च रोजी सदर शिक्षिका सुलतानपूर येथे येऊन ते सोने बघून त्यांचा सौदा साडेनऊ लाख रुपयांमध्ये झाला त्यानंतर तीं शिक्षिका सोन्याचे सॅम्पल घेऊन गावाला गेल्यानंतर खरोखरचे सोने असल्याचे खात्री पटल्याने सदर शिक्षिका सोने घेण्यासाठी साडेनऊ लाख रुपये घेऊन सुलतानपूर येथे आली असता सोने विकणारा सचिन बनसोडे यांनी सदर शिक्षकेला जवळका शिवारात बोलावले ते सर्व गाडीतून जवळका शिवारात गेले त्यानंतर उतरून जंगलात गेले त्यावेळी तेथे दोघांनी सदरशिक्षिकेकडून साडेनऊ लाख रुपये मोजून घेतले आणि सोन्याच्या नाणे एका कॅटलीत टाकून तुम्ही इथून लवकर जा असे सांगून त्यांना पाठवून. दिले सदर शिक्षिका सोने घेऊन सिंदखेड राजा पर्यंत गेली असता त्यांनी ते सोने तपासून बघितले असता सदर सोने हे नकली दिसल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. लगेच त्यांनी मागे फिरून किनगाव राजा पोलीस स्टेशन गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी सदर तक्रार दाखल करून सचिन बनसोडे अधिक दोन अनोळखी लोक अशा तीन लोकांवर गुन्हे दाखल केले. असून पुढील तपास ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर गवई गणेश डोईफोडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!