May 8, 2024

ॲडॉप्ट ट्री कॅम्पेन ची संकल्पना देशातीलच नव्हे तर सद्यस्थितीत विश्वातील लोकांनी प्रेरणा घ्यावी अशी ठरेल – डॉ. विजयकुमार कस्तुरे

लोकनेता न्युज नेटवर्क

अकोला :- सर्वत्र जळणारी व तोडण्यात येणारी जंगले तथा मानवीय विध्वंसाचा बळी ठरणारे पर्यावरण यावर अल्पशी जैविक फुंकर घालण्याचा प्रयत्न म्हणून, डॉ. सदानंद भुसारी सरांपासून प्रेरणा घेऊन डॉ. निलेश कोरडे, डॉ. महेंद्र चांडक, डॉ. आशुतोष डाबरे, श्री. भरत लापूरकर, श्री. निलेश सोनी तथा त्यांच्या काही सामाजिक कार्यकर्त्या मित्रांनी मिळून – ॲडॉप्ट ट्री कॅंपेन – अर्थात तरूवर के हो हम सब पालक ही प्रकल्प संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी २०१६ मध्ये – शुभंकरोती फाऊंडेशन,अकोला – या संस्थेची स्थापना करून त्या द्वारे जनसामान्यांच्या मनात पर्यावरण बचाव ची आवड तथा वृक्षारोपणाची इच्छाशक्ती निर्माण होऊन झाडे लावून ती जगवण्यासाठी त्यांचे पालक होऊन बालकासमान संगोपन व संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने वृक्षारोपणासाठी योग्य जागा शोधून

 त्या रोपट्याची योग्य देखभाल करण्यासाठी पालक सुध्दा नियुक्त करण्याची एक आगळीवेगळी मोहीम सुरू करून आजपर्यंत तेरा हजार पाचशे झाडांची रोपे लावून ती प्रत्यक्षात जगवीली सुध्दा असून सुरूवातीला लावलेल्या रोपट्यांचे आज चाळीस ते पन्नास फूटापर्यंत वाढलेले आहेत. आणि याच मोहीमेची यावर्षीची सुरूवात करताना जागतिक पितृदिनाच्या पर्वावर या प्रकल्पाच्या कृतीशील मान्यवरांच्या निमंत्रणावरून आपल्या सामाजिक कार्यासाठी दक्षिण-पश्चिम अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली तथा साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ कवी बबनराव महामुने, हिवरा आश्रम, व सामाजिक कार्यकर्ते कवी अंकुश पडघान, बोरगाव काकडे, जि. बुलढाणा यांनी अकोला येथे नियोजित स्थळी हजर होऊन ॲडॉप्ट ट्री

 कॅंपेन च्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान केला. त्यावेळी संस्थेच्या या पवित्र कार्याबाबत आपले विचार मांडत असताना डॉ. कस्तुरे यांनी वरीलप्रमाणे उद्गार काढले. तसेच साहित्यिक महामुने यांनी, एवढ्या मोठ्या प्रमाणात १३,५०० च्या संख्येत वृक्ष रोपट्यांची रोपणासह कायम स्वरूपी संगोपन तथा संवर्धनासाठी वृक्ष पालकत्वाची एकमेवाद्वितीय मोहीम कुण्या एका संस्थेने अशा यशस्वी पध्दतीने राबविल्याचे ऐकीवात नसल्याचे विधान केले. तर कवी अंकुश पडघान यांनी सुध्दा या अभिनव अभियानाची प्रशंसा करून गावोगावी असा प्रकल्प राबविला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी मा. प्रशांत भारती, मा. मदन इंगोली, मा. दीपक सोनी, मा. संतोष धुमणखाडे, मा. महेंद्र दैवेज्ञ, मा. गोपाल खोटरे आणि मा. निलेश सोनी तथा बरीच कार्यकर्ता मंडळी उपस्थित होती.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!