May 8, 2024

ज्येष्ठ कथाकार व कवी बबनराव महामुने यांना साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून मराठी साहित्यातील मानद डॉक्टरेट – डी-लिट – प्रदान..!

लोकनेता न्युज नेटवर्क

पाँडेचेरी (पुडुचेरी) :- आपल्या लोकप्रिय व वैशिष्ट्यपूर्ण आणि उल्लेखनीय शैलीने रसिकांच्या मनाची पकड घेणाऱ्या कथालेखन तथा कथन, कविता व प्रभावी सूत्रसंचालनासाठी महाराष्ट्र, गोवा, गुजराथ तथा कर्नाटक ई. प्रांतात प्रसिद्ध असलेले बबनराव महामुने ( हिवरा आश्रम, बुलढाणा ) यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून मराठी साहित्यातील मानद डॉक्टरेट ऑफ लिटरेचर अर्थात ऑनररी डी लिट ही पदवी पांडेचरी ( पुडुचेरी ) येथे हॉटेल ली रॉयल पार्क च्या सुशोभित सभागृहात दि. २२ – ०७ – २०२३ रोजी आयोजित भव्य पदवीदान समारंभामधे, विद्यापीठ प्रतिनिधी तथा विशेष निमंत्रित तथा विविध शैक्षणिक क्षेत्रातील बहुतांश पदव्युत्तर पदव्या प्राप्ती मुळे लिमका तथा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद असलेले केंब्रिज विद्यापीठाचे रिसर्चर जस्टिस मा. डॉ. पांडीयन, केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले, विश्वव्यापी ज्योतिष गुह्यविज्ञान एवं अध्यात्मिक विश्वविद्यालय प्रतिनिधी डॉ. सारिका कुळकर्णी, जिनिअस इंटरनॅशनल फिल्म स्कूल चे संस्थापक अध्यक्ष व टॉलीवूड हिरो एम्. एस्. अरूलमणी या सर्वांच्या हस्ते तथा इतर विद्वत्जनांच्या उपस्थितीत, सन्मानपूर्वक सत्कारासह प्रदान करण्यात आली. तथा त्यांच्या सह त्यांच्या अर्धांगिनी सौ. मंगल बबनराव महामुने यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच केंमासंनदि चे डॉ. मिलिंद दहिवले यांनी डॉ.महामुनेंना कडकडून मिठी मारून व विश्वविद्यालयाच्या डॉ. सारिका कुळकर्णी यांनी पुष्पगुच्छाने त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. याप्रसंगी केंमासंनदि चे राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय क्राईम रिपोर्टर म्हणून नुकतीच नियुक्ती झालेले डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, तथा याच समारंभात सामाजिक कार्यास्तव डॉक्टरेट प्राप्त डॉ. डी. व्ही. खरात सर, सामाजिक कार्यकर्ते अंकुश पडघान तथा सबंध देशभरातून निमंत्रित मान्यवरांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले तथा भावी वाटचालीस शुभेच्छा सुध्दा दिल्या.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!