May 8, 2024

राष्ट्रसंत भगवानबाबा जयंतीदिन भक्ती-शक्ती दिन घोषित करावा – प्रा.वा.ना.आंधळे

लोकनेता न्युज नेटवर्क

जळगाव :- अध्यात्मिक क्षेत्रातील राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे समाजकार्य व प्रबोधन कार्य हे ऐतिहासिक तथा गौरवशाली राहिले आहे.सामाजिक समता स्थापण्यासाठी तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचे असलेले योगदान लक्षात घेता त्यांचा जयंतीदिन भक्ती-शक्ती दिन शासन पातळीवरून घोषित करण्यात यावा.या आशयाचे निवेदन आज दि.१सप्टेंबर २०२३ सोमवार रोजी एरंडोल येथील समस्त वंजारी समाजाच्या पंच मंडळाने माननीय तहसीलदार महोदया यांना सादर केले.त्यावेळी वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य समिती सदस्य प्रा.वा. ना.आंधळे यांनी निवेदन सादर करते समयी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी एरंडोल येथील वंजारी समाज अध्यक्ष बबनराव वेडु वंजारी,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल आंधळे,गोपाळ आंधळे,सुरेश सांगळे,शिवाजी वंजारी,रवींद्र सांगळे,प्रकाश सांगळे,ज्ञानेश्वर घुगे,व पत्रकार प्रकाश वाणी यांची उपस्थिती लाभली.

About Post Author

error: Content is protected !!