खांदवे सुमित यांच्यासह नागरिकांची मागणी
लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा :- मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय मंजूर करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुमित खांदवे यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे शहर राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्माने पावन झालेले ऐतिहासिक शहर आहे. सन १९८२ साली सिंदखेडराजाला तालुक्याचा दर्जा मिळाला असला तरी आजही सिंदखेडराजा तालुक्यामध्ये शासकीय महाविद्यालयीन शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. सिंदखेड राजा हा ग्रामीण भाग असून येथील स्थानिक लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. या ठिकाणी महाविद्यालय नसल्यामळे येथील विद्याथ्यांना पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जावे लागते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शासकीय बी फार्म, डि फार्म हे कॉलेज नसल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अमरावती, सातारा (कराड), रत्नागिरी, पुणे, मुंबई सारख्या शेकडोकिलोमिटर घरापासून दूर जावे लागते.
सिंदखेडराजा तालुक्यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे त्यात काही शेतकरी अल्पभुधारक शेतकरी असल्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांचा बाहेरील शैक्षणीक खर्च परवडत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबतची दखल घेवून सिंदखेड राजा भागात एक शासकीय डी फार्म, बी फार्म महाविद्यालय मंजुर करूनदेण्यात यावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदनावर फार्मसी कृती समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित खांदवे, भाजपचे युवा नेते अॅड. संदिप मेहेत्रे, ज्ञानेश्वर बुधवत, निशांत नागरे, आकाश जायभाये, आकाश जायभाये, बालासाहेब भालेराव, बद्र चौधरी, दत्ता बरडे, आकाश घाटोलकर, सुरज आढाव, मयुरेश टेकाळे, आकाश डोईफोडे, लक्ष्मीकांत जावळे ओम जायभाये, ऋषिकेश डोईफोडे, आकाश चव्हाण, कृष्णा मान्टे, गणेश नागरे आदींसह एक हजार नागरिकांच्या सह्या आहेत.
___________________________________
संबधित बातम्या
सावखेड तेजन येथील जनता विद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
ई-पिक पाहणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
यवत येथे भजन स्पर्धा आणि किर्तन मोहत्सवाचे आयोजन