May 9, 2024

मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय मंजूर व्हावे यासाठी फार्मसी कृती समिती करणार निवेदन

खांदवे पाटील यांच्या नजरेतीलमहाविद्यालय

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा :- मातृतिर्थ सिंदखेड राजा हे शहर माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्माने पावन झालेले ऐतिहासिक शहर आहे. सिंदखेडराजा तालुक्यामध्ये कोणतेही शासकीय शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही.

     सिंदखेड राजा हा परिसर ग्रामीण भाग असुन येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे‌ त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आपल्या मुलांचा बाहेरील शैक्षणिक खर्च परवडत नाही परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शैक्षणिक नुसकान होऊन बेरोजगार मुलांची संख्या देखिल वाढत आहे. असे असून देखिल येथे शेतकऱ्यांच्या खिशाला परवडेल असे शासकीय महाविद्यालय नाही.

     विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ही बाब लक्षात घेऊन, फार्मसी कृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष सुमित खांदवे पाटील यांनी आवाज उठवला आहे. जेणे करून लवकरच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाच्या फुटेल.

निवेदन करण्यासाठी ६ मार्च रोजी तहसील कार्यालय येथे सर्वांनी हजर राहावे – फार्मसी कृती समितीचे प्रदेश उपाध्यक्ष खांदवे पाटील

     सर्वांनी मिळून सिंदखेड राजा तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी दि.०६ मार्च वार सोमवार ला ठीक ११ वाजता सिंदखेड राजा तहसिल कार्यालयात सर्वांनी मोठ्या संख्येने हजर राहावे. असे आवाहन फार्मसी कृती समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित खांदवे पाटील यांनी लोकनेता न्युज च्या टिम सोबत बोलत असतांनी केले.

___________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!