लोकनेता न्युज नेटवर्क
बीड :- बीड तालुक्यातील मौजे श्री क्षेत्र भुमेश्वर मंदिर सावंतवाडी येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त तसेच अर्जुन बाबा सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून अन्नदान मोठ्या प्रमाणात केले. सकाळी दहा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत अन्नदान चालु होते. प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी मोठया प्रमाणात अन्नदान केले. कोरोना काळामध्ये कोविड असल्यामुळे अन्नदान करण्यात आले नव्हते कोविड नंतर प्रती वर्षा प्रमाणे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी अन्नदान केले. अर्जुन बाबा यांची भूमेश्वर देवस्थान यांच्यावर मोठी श्रद्धा होती. अर्जुन बाबा नेहमीच मंदिरात यायचे, नित्यनियमित पूजा करून भगवान शंकराची पूजा करायची म्हणून गावकऱ्यांनी लक्षात घेता त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात अन्नदान केले. यावेळी विशेष सहकार्य मठाधिपती महंत बाळनाथ महाराज डिसले ( श्री क्षेत्र भुवनेश्वर देवस्थान विजयनगर वैतागवाडी ) यांचे आहे.
इथून पुढे सुद्धा भव्य दिव्य प्रकारे नियोजन करून बाबांची पुण्यतिथी साजरी करणार असल्याचे मीडियाशी बोलताना महाराजांनी तसेच गावकऱ्यांनी सांगितले. यावेळी अन्नदान करत असताना उपस्थिती शहादेव सावंत, नारायण सावंत, प्रतिक सावंत, अतुल सावंत, ज्योतिराम सावंत , अर्जुन सावंत, माणिक सावंत, सुधाकर सावंत, राजेंद्र सावंत तसेच यावेळी गावातील महिलांनी मोठे सहकार्य केले.
_____________
संबधित बातम्या
चिखलीच्या अखंड हरिनाम सप्ताहाला मनोज जरांगे पाटलांची भेट
चिंचेवाडी येथील मुंडे समर्थक युवकाने फेसबुक वर अलविदा लिहीत संपवली जिवन यात्रा
आष्टी तहसिलदारांची गाडी जळून खाक; पहाटे अडीच ची घटना