May 20, 2024

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब पुण्यस्मरण दिन; अभिवादन सभेत लाखो चा जनसमुदाय gopinathrao mundhe

तुमचे प्रेम,तुमची दिशा ,आणी तुमची दशा हेच माझे राजकारण राहील – पंकजाताई मुंडे

लोकनेता न्युज नेटवर्क

परळी वैजनाथ :- भारताचे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, मराठवाड्यातील दिन दुबळ्या चे भाग्य विधाते लोकनेते स्व, गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मा, पंकजाताई मुंडे यांनी अभिवादन करण्यास आलेल्या लाखो भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या , गेल्या काही काळापासून पंकजा मुडे भाजपमध्ये नाराज आहेत, अशी चर्चा माध्यमांमध्ये होत आहे. पंकजा मुंडे यांचे भाजपमध्ये खच्चीकरण होत आहे, पंकजा मुडे पक्षांतर करणार अशा चर्चा वारंवार होत असतात. मात्र आज स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात पंकजामुंडे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणे मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर  आपली    भूमिका स्पष्ट करतानाच.   मी अमित    शाह यांची भेट घेऊन

 त्यांच्याशी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.पंकजा मुंडे म्हणाल्या मीडिया फार माझ्या मागे आहे, त्यांचे ही माझ्यावर उपकार आहेत, त्यांचे ही मी आभार मानते, माझं म्हणणं त्यांनी पोहचवलं कोणत्याही अर्थाने पोहचवलं तरी माझ्या माणसापर्यंत ते बरोबरच पोहचतं. त्यामुळे ते माझ माध्यम आहे, त्यांना आज वाटतयं ताई काय बोलणार आहेत. माझ्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये याच ठिकाणी डाव्या बाजूला मी अनेकवेळा हजार वेळा माझी भूमिका मांडली आहे, ती परत परत मांडावे एवढे लेचीपेचे माझे शब्द नाहीत. माझे शब्द ठाम आहेत, जसे रामाने बाण सोडल्यानंतर तो परत येत नसतो. तसा माणसाच्या तोंडात शब्द असावा, शब्द गोल फिरवायची वेळ येऊ नये. माझ्या डाव्या बाजूला प्रचंड मोठी कमळाची आकृती आहे, त्यामध्ये विसावले आहेत माझे पिता गोपीनाथ मुंडे. आयुष्याात कधीच सत्तेचे स्वप्न बघू शकत नाही अशा पक्षात राजकारणात सुरुवात केली आणि सत्तेच्या उच्च शिखरापर्यंत पक्षाला पोहचविण्यापर्यंत ज्यांचं योगदान आहे, त्या गोपीनाथ मुंडे यांची मी कन्या आहे.
त्यांनी मला राजकारणात आणले आणि स्वत: ढोक महाराजांनी सांगितले, इथे मारुलकर असतील ते सांगतील जेव्हा मुंडे साहेब मंत्री झाल्यावर भगवान गडावर आले, तेव्हा ढोक महाराजांना ते म्हटले, माझ्या पंकजाकडे लक्ष द्या. भगवान गडावर जेव्हा मुंडे साहेब शेवटचे आले होते, तेव्हा ते म्हणाले होते मला भगवानगडावर पंकजा दिसते. हे माझं प्रमोशन करण्यासाठी नाही. पण पंकजाचीच काळजी घ्यावी म्हणजे त्यांना फक्त माझीच काळजी आहे असं नाही. त्यांना  माहितीय    तुम्ही फक्त   पंकजाची   काळजी घ्या पंकजा तूमची बाकीची सगळी काळजी

 घेईल. कारण मला माहिती आहे, माझं आणि माझ्या बाबांच नातं काय होतं. मी कधी त्यांची बहिण झाले, कधी आई झाले, कधी मुलगी झाले आणि आयुष्यभरासाठी त्यांचा मुलगा म्हणून त्यांचे काम बघत आहे. हे काम करत असताना जर डोळे बंद मुंडे साहेबांचे स्मरण केले तर आपल्याला एक वाक्य आठवत राहते, कानात गुंजत राहते ते म्हणजे मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही. हे वाक्य गोपीनाथ मुंडे यांनी जेव्हा उच्चारले त्यानंतर मी हजारो वर्ष उच्चारले तरीही त्या वाक्याचे महत्त्व कमी होणार नाही. मुंडे साहेब हे वाक्य उच्चारत होते ते तुमच्यासाठी उच्चारत होते. कारण थकलेल्या, रुकलेल्या, वंचितांना वाली बणण्यासाठी मुंडेसाहेब त्या वाक्याचा उच्चार करत होते. कोणाला धमकावण्यासाठी, कुणाला सांगण्यासाठी, इशारा देण्यासाठी ते या वाक्याचा उच्चार करत नव्हते. ज्याला इशारा मीळायचा त्याला इशारा मिळतच असतो.
            अनेक लोकं निवडणूका हरले त्यांना सधी दिली. कदाचित दोन डझन आमदार, खासदार झाले गेल्या चार वर्षात त्यामध्ये जर मी बसत नसेल तर लोक चर्चा करणार. ती चर्चा मी ओढवलेली नाही. पण माझ्या मनात विश्वास आहे. माझा नेता आहे अमित शाह मी त्यांची भेट घेणार आहे .     मी त्यांना     वेळ मागितला आहे.    त्यांच्याशी मी

 मनमोकळं बोलणार आहे. त्यांना विचारणार आहे, कारण माझा पिता आता जिवंत नाही. त्यांच्याशी मी बोलणार हितचिंतक खुप आहेत, दुसऱ्याही पक्षात आहेत. सगळ्यांनी आतापर्यंत जे जे बोलले त्यांचे मी आभार मानते. रडगाणे गाणारी मी नाही. बाप मेला तरी डोळ्यात अश्रु येऊ दिला नाही मी, शपथ खाल्लेली माणूस आहे मी. मला आज तुमच्या सर्वांसमोर स्पष्टपणे सांगायचं आहे. तुमच प्रेम, तुमची दिशा आणि तुमची दशा हेच माझं राजकारण ठरवणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

प्रतिनिधी|विजय रोडे

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!