May 8, 2024

बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे रणकंदन कोठेही जिवीत हानी नाही, भगवानगडाच्या पायत्याशी असलेला टोल नाका भुई सपाट

लोकनेता न्युज नेटवर्क

परळी :- परळी शहरात आज ४ जूनच्या दुपारी तीन च्या सुमारास बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळाने तडाखा दाखवला..तर काही ठिकाणी पाऊस आणि वारा बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावात अनेक हॉटेल भुई सपाट झाले आहेत, परळी शहरात देखील दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हवेचा अर्धा तास वादळाने गोंधळ घातला, व्यावसायिकांनी व छोट्या व्यापारी यांची धावाधाव    व धांदल उडाली   होती,  परळी  तालुक्यातील अनेक

गावांत सध्या तुफान वादळ झाले आहे. काही घरांवरील पत्रे उडाल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. आज वाऱ्याचा वेग येवढा प्रचंड होता की समोरील रस्ता व दुकाने दिसत देखील नव्हते, भगवान गड येथील तर टोल नाका भुई सपाट झाल्याची माहिती मिळाली आहे, कोठेही जिवीत हानी झाली नाही असे माहिती मिळात आहे.

प्रतिनिधी|विजय रोडे

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!