आम्हाला केवळ पाणी द्या गावकऱ्यांचे ग्रामपंच्यायत ला साकडे

सावखेड तेजन ग्रामपंचायतच्या नळयोजनेच्या पाण्यापेक्षा मुतने बरे,गावकऱ्यांचे उद्गारवाचक शब्द
लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा :- एकविसाव्या शतकात जीवन जगत असतांना. आपल्याला दिसून येते की जग हे डिजिटल झालेल आहे. आणि तरि देखील काही गावांमध्ये आज सुद्धा योग्य पाणी पद्धतीने मिळत नसेल तर आज सुद्धा आपण पारतंत्रात जगतोय अस दिसून येईल. दिवसांदिवस विकसित होत चाललेल्या या जगात काही भागांमध्ये वारंवार तेच प्रश्न निर्माण होत असेल तर? तर बाकीच्या विकासा पासून तो भाग किती वंचित असावा असा देखील एक प्रश्न येथे निर्माण होतो.. जर अजून पाणीच मिळत नसावे तर बाकीच्या विकासासाठी समाज कळासोसत असावा.
सावखेड तेजन ग्रामपंचायतची नळ योजना ही बोगस होत चालली. गावातील काही भागात भरमसाठ पाणी येऊन ते नाल्यानद्यारे वाहातांना दिसत. तर काही गल्यांना पिण्या इतके पाणी देखील येत नाही आणि आलेले पाणी हे दोन फुट गड्डा असलेल्या ठिकणवून भरावे लागते अशा परिस्थिति मध्ये गावकऱ्यांनी काय करावं? हा मोठा प्रश्न सावखेड ग्रामसतांना झालाय.
सावखेड तेजन ग्रामपंचायतच्या नळयोजनेच्या पाण्यापेक्षा मुतने बरे,गावकऱ्यांचे उद्गारवाचक शब्द

नळयोजनेच्या पाण्यापेक्षा मुतने बरे एवढे कमी पाणी या ग्रामपंचायतीच्या नळयोजनेच्या नळाला पाणी येते. अगदी करंगळी पेक्षाही कमी धार येते व लोक या पाण्याची तासोंतास वाट पाहत असतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत व अशा परिस्थितीत लोकांचे पाण्यापोटी हाल होत आहेत. हे हाल ग्रामपंचायतला दिसत नाहीत का? दिवसेंदिवस नळाचे पाणी कमी होत चालले आहे. याकडे ग्रामपंचायतने गावातील नागरिकांच्या धडपडीची दखल घेऊन सुरळीत पाणीपुरवठा करावा. ग्रामस्थांना पाण्याची योग्य ती उपाययोजना करून योग्य ती सोय करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांची आहे.
_____________
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!