May 9, 2024

लोक-कलावंतांच्या हस्ते डॉक्टरेट हा माझा विशेष सन्मान आहे – डॉ. विजयकुमार कस्तुरे

लोकनेता न्युज नेटवर्क

बुलढाणा :- हजारो गीतामधून फुले-आंबेडकरी चळवळ तथा महापुरुषांचा मानवी कल्याणाचा संदेश भारतभरंच नव्हे तर देशविदेशात पोचविणाऱ्या लोकशाहीर वामनदादा कर्डकांपासून तर आजमितीसही आपल्या लोकगीते, लोक कला तथा शाहीरी द्वारे महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविणाऱ्या लोक-कलावंतांच्या दि. ११-०३-२०२३ रोजी बुलढाणा येथील सुप्रसिद्ध गर्दे सभागृहात आयोजित, महा मेळाव्यात, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा लोककलावंत संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व आपल्या शाहीरी गायनामुळे सर्वदूर ख्याती प्राप्त शाहीर विष्णू शिंदे यांच्यासह उपस्थित पुरस्कारार्थी व आंबेडकरी चळवळीतील खंदे सेनानी आयुष्मान दत्ता हिवाळे तथा महा मेळाव्याचे आयोजक व वामनदादांचे शिष्य शाहीर डी. आर. इंगळे, नांदेड येथील शाहीर किर्तने, कलावंत मानधन समितीचे माजी अध्यक्ष शाहीर निवृत्ती घोंगटे, शंकर महाराज सोळंकी, साहित्यिक सुरेश साबळे, केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे नॅशनल कोअर कमिटी सदस्य कथाकार बबन महामुने, वामनदादांचे कलानुयायी गायक डिगंबर पवार पेंटर इत्यादींच्या हस्ते आपला पुरस्कार तथा सत्कार स्विकारतांना सातासमुद्रापार साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून आपल्या आजीवन समाजकार्यासाठी ” डॉक्टर ऑफ सोशल वर्क ” ही मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त ॲडव्होकेट डॉ. विजयकुमार कस्तुरे, चिखली, जि. बुलढाणा यांनी सदर विद्यापीठ पदवीदान समारंभासाठी प्रदान करण्यात आलेल्या वेशभूषेत हा लोक-सन्मान स्विकारतांना वरीलप्रमाणे ऊदगार काढले व या सर्व समाजसेवक लोक-कलावंतांच्या साक्षीने हा पुरस्कार घेतांना मी आज धन्य झालो…..असे म्हणाले. सदर कार्यक्रम प्रसंगी ईतरही मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. मा. शाहीर विष्णू शिंदे, मा. आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी लोक-कलावंतांच्या प्रलंबीत असलेल्या तथा मान्य झालेल्या मागण्या तसेच लोक-कलावंतांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकशाहीर वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी शासनाकडे मागणी करण्याची गरज, महा मानवांच्या प्रतिमा तथा लोककल्याणकारी योजना याबाबत माहिती दिली. मा. दत्ता हिवाळे, मा. सुरेश साबळे, शाहीर ईंगळे, शाहीर किर्तने व इतर यांनी सुध्दा कलावंतांच्या समस्या संदर्भात कळकळीने आपले विचार मांडले.
          कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाराष्ट्रभरातून आलेल्या महिला व पुरुष शाहीर कलावंतांनी गीत गायन तसेच मा. गणेश कदम यांनी वासुदेव आला च्या पारंपारिक गीत व कलेद्वारे, तथा चिखली येथील कलावंत ढोलकमास्तर साबळे,सुरेश अवसरमोल, प्रतीक वानखेडे,अंकुश पडघान ई. नी प्रबोधन केले. मेळाव्यास हजारो कलावंतांची उपस्थिती होती.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!