May 9, 2024

समाजसेवेचा महामेरू सचिन डोईफोडे; गेल्या अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त

लोकनेता न्युज नेटवर्क

      समाजामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी समाजाच्या समस्येला तसेच अठरापगड पीडित वंचित समाजाला, मित्र परिवाराला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रभर संभाजीनगर जिल्ह्यातील सचिनभाऊ डोईफोडे नावाचा वादळ गेल्या अनेक दिवसांपासून न्याय हक्कासाठी घोंगावत आहे परंतु गेल्या तीन महिन्यापासून त्या वादळाला स्वादुपिंडाच्या गंभीर आजाराच्या संकटाने घेरल आहे…
     छोट्यातला छोटा प्रश्न असू द्या.. एका गरीब कार्यकर्त्यांनी जरी फोन केला आणि म्हटला की सचिन भाऊ मला अशी अशी मदत पाहिजे या अर्ध्या रात्री स्वतः सचिन भाऊ डोईफोडे तिथे हजर असत मित्र परिवाराला संकटकाळी मदत करणे, ओबीसी समाजासाठी, अठरापगड समाजाच्या न्याय हक्कासाठी नेहमी सचिन भाऊची आक्रमक भूमिका असते, अनेक आंदोलन शेकडो निदर्शने सचिन भाऊ यांच्या उपस्थितीत झाले..! संभाजीनगर शहरांमध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे स्मारक व्हावे यासाठी अनेक वेळेस उपोषण केली निदर्शने केली आणि शेवटी या वाघाने जिल्हाधिकारी कार्यालय समोरच स्मारकासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला.. एका सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना कुठल्याही संघटनेशी अथवा पक्षाशी हेवेदावे न करता सर्वांसोबत मैत्रीची संबंध तयार केले, समाजातील प्रत्येक घटकांना घेऊन सोबत जायचं मग तो विरोधातला असू की आपला याचा विचार कधीच सचिन भाऊ करत नाही ज्या ज्या ठिकाणी हा माणूस गेला त्याने तिथं प्रचंड मित्र संपत्ती कमावली असंच काही वर्षांपूर्वी जय भगवान महासंघामध्ये काम करत असताना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा फोन झाला की आपल्याला महाराष्ट्रभर दौरा करायचा आहे तुमचे म्हणणे सांगा? त्यावेळी या सचिन भाऊ चे उत्तर होतं साहेब निघायचं केव्हा आहे मी तुमच्या अगोदर तयार झालेला असेल सोबत निघाले संघटनेची बांधणी करण्यासाठी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला प्रत्येक ठिकाणी माणसं जोडत गेली सकाळी फोन करायचा दिवसभरात दहा-बारा कार्यक्रम घ्यायचे आणि संध्याकाळचे जेवण शेवटच्या कार्यक्रमाच्या कार्यकर्त्याच्या घरी करायचं असं नियोजन दौऱ्याचं होतं तब्बल हा दौरा 17 ते 20 दिवसांहून अधिक चालला, एवढ्या दिवसांमध्ये हा माणूस कधीच बाळासाहेबांना म्हणाला नाही नाही की आपल्याला परत केव्हा निघायचं? एकदा की जे काम हाती घेतलं ते काम मन लावून करायचं हे त्यांचं वैशिष्ट्य…!
     परंतु 12 जानेवारी 2023 नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या या ढाण्या वाघाला स्वादूपिंडाच्या गंभीर आजाराने घेरलं आणि सचिन भाऊ डोईफोडे यांना छत्रपती संभाजीनगर येथील माणिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इथे ऍडमिट करण्यात आलं त्यावेळेस परिस्थिती अतिशय नाजूक होती मध्यंतरी तब्येत सुधारणा होऊ लागली परंतु पुन्हा अचानक तब्येत बिघडल्यामुळे सचिन भाऊ यांना आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे ठिकाणी ॲम्बुलन्स द्वारे आणण्यात आलं तरी आता प्रकृती सुधारणेमध्ये चढ-उतार सुरू आहे या संकटाच्या काळामध्ये श्री. विलासबापू भुमरे (मा. सभापती, सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर), बाळासाहेबजी सानप (संस्थापकअध्यक्ष: जय भगवान महासंघ महाराष्ट्र राज्य), श्री.रमेशजी पवार(जिल्हाप्रमुख शिवसेना छत्रपती संभाजीनगर), श्री.धनराजजी गुट्टे (अखिल भारतीय वंजारी युवक संघटन), धनंजय भोसले, पांडुरंग डिघुळे असे अनेक दिग्गज सचिन भाऊचा आजही हॉस्पिटलचा कायम फॉलोअप घेत राहतात…!
      परंतु या संकटाच्या काळामध्ये सचिन भाऊ सोबत नेहमी सावलीसारखा असणारा दीपक शहादेव वाघ व सचिन भाऊ यांच्यावर आदर्श घडवणाऱ्या त्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या त्यांच्या आईसमान आत्या सौ. वर्षाताई नारायणराव वाघ, त्यांचे बंधू कृष्णा डोईफोडे आजही गेल्या तीन महिन्यापासून हॉस्पिटलसाठी 24 तास क्षणा-क्षणाला सचिन भाऊ यांच्या सोबत आहे, तसेच श्री.नारायणराव वाघ, मोहनराव कराड, माऊली (अण्णा) वाघ(सरपंच गेवराई ग्रुप ग्रामपंचायत जि. छत्रपती संभाजीनगर), जगन्नाथ जायभाये,गणेश वाघ (चेअरमन), ज्ञानेश्वर वाघ, योगेशजी खाडे,थोरे सर, उमेश चव्हाण, कृष्णा ढाकणे, कुणाल गजहंस,बळीराम सानप,ज्ञानेश्वर मुंढे,अक्षय जाधव, रोहित भालशंकर, जगदीश गवळी, शुभम लाड,विकास पवार, समाधान केंद्रे, आदि शेकडो सचिनभाऊ डोईफोडे यांच्यावर प्रेम करणारा वर्ग हॉस्पिटल कामी आळीपाळीने कार्यरत असतो..!
      तरी ढाण्या वाघ सचिनभाऊ डोईफोडे यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी व समाजामध्ये पुन्हा एकदा हा संघर्षयोद्धा त्याच रुबाबात बघण्यास मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपण सर्व मिळून करूया..!

•ज्ञानेश मुंढे

 संपादक दैनिक लोकनेता

 मातृतीर्थ सिंदखेड राजा

 7499615933

__________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!