लोकनेता न्युज नेटवर्क
बीड :- सालसिध्द बाबा संस्थान मिडसांगवी ता. पाथर्डी या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी संस्थानचे मठाधिपती महंत हनुमंत महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाने सालसिध्द बाबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सालसिध्द बाबा संस्थान मिडसांगवी या ठिकाणी सलग तीन दिवस मोठा यात्रा उत्सव असतो.दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक भक्त यात्रेनिमित्त दर्शनासाठी येत असतात.संस्थानचे मठाधिपती महंत हनुमंत महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेने या यात्रेचा महिमा वर्षानुवर्षे वाढतच चाललेला आहे.मिडसांगवी तसेच खरवंडी परिसरातील हजारो भाविकांसाठी सालसिध्द बाबा यात्रा हा प्रचंड मोठा उत्सव असतो.तसेच या यात्रेस दूरवरून लोक येत असतात.त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही या यात्रा उत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सालसिध्द बाबा संस्थान मिडसांगवीचे मठाधिपती महंत हनुमंत महाराज शास्त्री यांनी केले आहे.
या यात्रा महोत्सवाची सविस्तर रूपरेषा अशी आहे की,हि यात्रा दि.१५,१६ व १७ एप्रिल हे तीन दिवस राहणार आहे.शनिवार दि.१५ रोजी रात्री ठिक ९ वाजता संस्थानचे मठाधिपती महंत हनुमंत महाराज शास्त्री यांचे भव्य किर्तन होणार आहे.तसेच रविवार दि.१६ रोजी सकाळी ०७:३० ते १२:३० वाजता भगवान गडाचे मठाधिपती हभप महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व सालसिध्द बाबा संस्थान मिडसांगवीचे मठाधिपती महंत हनुमंत महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते भाविकांच्या कावडीच्या पाण्याने ”श्री” ला स्नान व नंतर सायंकाळी ठिक ०५ ते ०८ वाजता छबीना मिरवणुक व वाळवंटात शोभेचे फटाके उडविण्यात येतील.तद्नंतर रविवार दि.१६ रोजी रात्री ठिक ०९ ते ११ या वेळेत ह.भ.प शितलताई महाराज साबळे यांचे भव्य हरि किर्तन होणार आहे.तसेच सोमवार दि.१७ रोजी दुपारी ०३ ते ०६ या वेळेत कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे.याचबरोबर रात्री ०९ ते १२ या वेळेत लोकनाट्य तमाशा व लावण्याचा कार्यक्रम होईल विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम मोफत असणार आहेत अशी माहिती सालसिध्द बाबा संस्थान मिडसांगवीचे मठाधिपती महंत हनुमंत महाराज शास्त्री यांनी दिली आहे.याचबरोबर श्री सालसिध्द बाबा देवस्थान मिडसांगवी ट्रस्ट च्या वतीने संस्थानचे मठाधिपती महंत हनुमंत महाराज शास्त्री यांनी भाविकांना यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
संपादक|ज्ञानेश्वर मुंढे
_____________
zithromax uk – order generic bystolic nebivolol 5mg pills
prednisolone 5mg drug – cost azithromycin 250mg order prometrium 200mg pill
buy neurontin 800mg – where to buy itraconazole without a prescription buy generic itraconazole 100mg
order lasix 40mg pills – nootropil 800 mg brand order betamethasone generic
buy generic zanaflex – how to buy hydroxychloroquine buy hydrochlorothiazide 25mg pill
cheapest cialis online – guaranteed cialis overnight delivery usa buy viagra 100mg pills
buy viagra generic – sildenafil 100mg uk generic cialis 10mg
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
buy lipitor 20mg for sale – buy amlodipine pill lisinopril online buy