शरद पवारांनी घातला पुन्हा एकदा गोंधळ पहा नवीन भूमिका

जीआरएफजीव्हीडी

लोकनेता न्युज नेटवर्क 

      राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे आणि त्यांच्या नावाविना महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राचे राजकारण चा इतिहासच काय तर साधा एखादा लेख जरी लिहायचा म्हटलं तरी शरद पवारांना टाळता येणं अशक्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पलटवार आणि गणिमी कावा शरद पवारांसारखा अजून कोणालाही जमलेला नाही. शरद पवारांचे राजकारणातील डाव फक्त त्यांनाच कळतं अजून

 तरी महाराष्ट्रात त्यांचे डाव कोणाला कळण अश्यक आहे. दोन मे रोजी शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादी पक्षाचा आता काय होणार? व नवीन अध्यक्ष कोण होणार? या चढाओढी मध्ये व पवार साहेबांच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले होते. मात्र पुन्हा एकदा शरद पवारांनी हा डाव कसा टाकला व कशासाठी टाकला हे कोड उलगडणं अशक्य होतं. मात्र शरद पवारांनी पुन्हा हा राजीनामा फेटाळुन लावला आहे.

   शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक धुरंधर मराठी राजकारणी म्हणून प्रचलित आहेत. “राजकारणात कधी थांबावं आणि कधी पुढे जावं हे मला चांगलं कळतं” असं वक्तव्य शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केलं ‌. मात्र शरद पवारांचा डाव काय आहे हे कळणं अशक्य आहे. शरद पवार यांनी स्वतःचा राजीनामा स्वतःला लावला आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचे पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवार हेच काम पाहणार आहेत हे मात्र निश्चित झालय की काय? असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये कधी कुठलीही मोठी घटना झाली व गोंधळ निर्माण झाला तर शरद पवार यांच्या वक्तव्याकडे व भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असते. आजपर्यंत महाराष्ट्रात जेव्हा

 जेव्हा राजकीय भूकंप घडले तेव्हा तेव्हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक हालचालीत शरद पवारांचा मोठा वाटा असायचा. मात्र आता गेल्या एक महिन्यापासून अजित पवार भाजपा जाणार की काय अशी चर्चा माध्यमांमध्ये रंग होते तर राष्ट्रवादीच्याच काही बॅनर वरती अजित पवारांचे फोटो नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी अस्थिरता निर्माण झाली होती त्यामुळे अचानक शरद पवारांनी केलेले हे वक्तव्य यांच्या चहात्यांच्या व कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून पाणी आणणार होतं. मात्र आता राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार यामध्ये मोठा तेढ आहे. याकडेच संपूर्ण राष्ट्रवादी समर्थकांचे लक्ष लागलेले आहे.

᳓हे देखील वाच👉शेतकऱ्यांची चिंता संपली; कापूस दरवाढी बद्दल पहिल्यांदाच मोठे विधान

About Post Author

error: Content is protected !!