May 9, 2024

केरळ मधील मलप्पुर येथे पर्यटकांची नाव उलटून 22 जणांचा मृत्यू

This get from this site or source

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

केरळ (kerala) :- मलप्पूरमधील तनूर भागातील थुवल थेराम (Thooval Theeram) बीच जवळ डबल डेकर बोटीचा रविवारी संध्याकाळी अपघात झाला. 

      जहाज ही 20 लोकांच्या क्षमतेपेक्षा जास्त भरलेले असून, नाव एका बाजूला झुकत होती. हे माहिती असून देखील नाव चालकाने याकडे लक्ष दिले नाही. नशीबवान ही जहाज सुरूवातीला एक मासेमारी नौका होती. नौकाच्या मालकाने पर्यटन सेवेच्या उद्देशाने त्याचे रूपांतर केले. अहवालात असे म्हणले गेले की बोटीला बाहेर पडण्यासाथी दोन च दरवाजे व खिडक्या होत्या त्यामुळे पर्यटकांना बाहेर पडता आले नाही.

     यामध्ये 22 जन ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री पिनाराई  यांनी प्रत्येकी 10 लाख रुपयाची भरपाई  जाहीर केली आहे. 

     बोटीने संध्याकाळी 6 वाजेच्या नंतर जहाजे न चालवण्याच्या नियमचे उल्लघन केले आहे.केरळ चे विरोधी पक्ष नेते व्हीडी सतीसन यांनी माध्यमांशी बोलत असतांना संगितले की, या बोटीला बोटीला परवाना होता का नाही हे देखील कोणाला माहिती नाही. 

        जहाजाचा मालक फरार असून त्यावर निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!