आम्ही कोणत्या भारतात राहतो?

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

दगडा समोर हात जोडून
जो तो येथे भक्त होतो
देशाच्या प्रधानजी सांगा
आम्ही कोणत्या भारतात राहतो?

रेशन पासून, ऑक्सीजन पर्यंत
भ्रष्टाचार मनसोक्त होतो
देशाच्या प्रधानजी सांगा
आम्ही कोणत्या भारतात राहतो?

कोरोना आला सांगीतले की
आम्ही स्वत: ला कोंडून घेतो
टाळ्या, थाळ्या वाजवून
खरंच का कोरोना जातो?
देशाच्या प्रधानजी सांगा
आम्ही कोणत्या भारतात राहतो?

गरीबी, बेरोजगारी, महागाईचे प्रश्न सोडून
खोदकामात का इतके गढून जातो?
चार घास मिळवताना
आमच्या पाठीचा कणा मोडून जातो
देशाच्या प्रधानजी सांगा
आम्ही कोणत्या भारतात राहतो?

गावकुसाबाहेर ही कधी मारून बघा चक्कर
झोपड्या, नाल्या, उकीरड्याचा किती वास येतो
रस्त्या शिवाय अपघातात नेहमीच
गरीब तरूणांचा जीव जातो
देशाच्या प्रधानजी सांगा
आम्ही कोणत्या भारतात राहतो?

भुकेच्या प्रश्नांचे उत्तर कोणाला मागावे?
बेरोजगार तरूणांचे हाल, सांगा कोणाला सांगावे?
वाढलेली दलाली, फासावर लटकतो शेतकरी
राजकारणी उडतात विमानाने,
आम्ही एसटी साठी ही तरसतो
देशाच्या प्रधानजी सांगा
आम्ही कोणत्या भारतात राहतो ?

भारतमातेचे लेकरं सारेच ना आपण?, मग
गरीबांसोबतच का असा दुजाभाव होतो?
मत मागता ना आमचे ही, भाऊ, बहीण म्हणून
तुमच्या कोट्यातला, आमचा विकास मग
सांगा कुठे जातो?
देशाच्या प्रधानजी सांगा
आम्ही कोणत्या भारतात राहतो?

बुध्दी अस्वस्थ करते, नाही तर केले नसते प्रश्न
लोकशाहीच्या काळात, जीभ का अडखळते?
बातम्या आणि फोटोमध्ये, देशाचा विकास बघून
माझ्यासारख्याच्या मेंदूत खुप लोच्या होतो
देशाच्या प्रधानजी सांगा
आम्ही कोणत्या भारतात राहतो?

उत्तराची अपेक्षा नाहीच,
अंगाचा मात्र तिळपापड होतो
मंदिर, मस्जिद च्या दंगलीमध्ये
सच्चा भारतीय शहीद होतो
देशाच्या प्रधानजी सांगा,
आम्ही कोणत्या भारतात राहतो?

देशाच्या प्रधानजी सांगा
आम्ही कोणत्या भारतात राहतो?

(ॲड. वर्षा गोविंद कंकाळ )
मातृतिर्थ सिंदखेडराजा
जिल्हा : बुलढाणा
🇮🇳 I am Indian 🙏

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in

About Post Author

error: Content is protected !!