May 9, 2024

जालना मेहकर रोड वर सिंदखेड राजा लगत एसटी बस व ट्रक चा भीषण अपघात, 6 जाग्यावर ठार तर 16 गंभीर

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा :- तालुक्यालगत पळसखेड चक्का वरुण गेलेल्या मुंबई नागपूर महामार्गावर बस व ट्रक चा भीषण अपघात सकाळी 06:00 वा. दरम्यान घडला. अपघाता दरम्यान जागीच 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली तर 16 जन गंभीर जखमी असून त्यांना सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल केल्या गेल. 

       मेहकर आगाराची रातराणी बस ही पुण्यावरून वापस येत असताना हा अपघात झाला. या मध्ये बस चालक राजू कुलाल हिवारा आश्रम सहित पाच प्रवाश्यांचा मृत्यू झाला. असून वाहक जखमी आहे. मृतकांची नावे   पुढील  प्रमाणे आहेत. बस चालक राजू तुकाराम कुलाल, ४२, वडगाव

तेजन, ता. लोणार, ह. मु. हिवरा आश्रम, ता. मेहकर, शेषराव उत्तमराव खराबे, वय ६५, अंत्री देशमुख, ता. मेहकर, वनमाला किशोर पवार, वय ३०, बेलगाव, ता. मेहकर, सीमा सोमेश्वर जोशी, वय ५०, मेहकर, गोकर्णा रामदास खिल्लारे, वय ४५, केळवद, ता. चिखली व कंटेनर चालक (ज्यांचे नाव मिळू शकले नाही) गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना पुढील उपचारा साठी जालना येथे हलवण्यात आले. 

         या घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा नजीकचे ठाणेदार युवराज रबडे व त्यांचे सहकारी घटनाथळी ताबडतोक पोहचले. उपस्थित गावकर्‍यांनी व पोलिसांनी मदतकार्य सुरू करून जखमींना सिंदखेड राजा राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल. 

            या अपघाता मध्ये बस अक्षरशा अर्धी चिरत गेलेली होती व मृत्यू पडलेल्या व्यक्तींचे देखील बघवेना असे हाल झाले होते.

_________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!