May 20, 2024

तु भारी तुझा घरी तरी होती का माझी परी; शेतकरी पुत्राने केली थेट गौतमी पाटीलला लग्नाची माघणी gautami patil

लोकनेता न्युज नेटवर्क

बीड :- काही दिवसा पासूनच नव्हे तर माघील काही वर्षा पासून गौतमी पाटील ही नेहमी चर्चे मध्ये असते मंग कारण कोणतही असो…आणि बीड जिल्हया मध्ये देखील नेहमी नवनवीन शोध लागणे सुरूच असतात. 

          असेच एक कारण परत एकदा तिला चर्चे मध्ये घेऊन आले आहे. बीडच्या एका शेतकरी पुत्राने चक्क गौतमीला लग्नासाठी मागणी घातली आहे. जरी तुझा सोबत कोणी लग्न करायला नसेल, तरी माणुसकीच्या नात्याने मी तुझा सोबत लग्न करायला तयार आहे. असे त्याने थेट पत्राद्यारे गौतमीला म्हणले आहे. 

बघा पत्राद्यारे लिहल तरी काय बघा सविस्तर👇

          पत्राद्यारे त्याने व्यक्त केल्या भावांना  “गौतमी पाटील तु भारी तुझ्या घरी पन तु होती का माझी परी, मी रोहन दादा गलांडे (पाटील) मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहीण्याचे कारण एका मुलाखतीमध्ये तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती कि, “आता मी 25 वर्षाची आहे. लग्न करुन घरसंसार थाटावा अशी माझी ईच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छे प्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही, त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून ईच्या आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.” तरी तुझ्या वरील सर्व ईच्छा अटी मला मान्य आहेत. तरी मी रोहन दादा गलांडे (पाटील) मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तरी तु जशी आहेस तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुनी लग्नाला तयार नसले तरी मी मानुसकिच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे. शेती बागायती आहे, दुग्ध व्यावसाय आहे. तु जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर तु मला भेटायला ये.

      पठयाने थेट गौतमीला पत्रात अस म्हणल आहे की तुझा सर्व अटी मला मान्य आहेत आणि त्याने स्वत:चा देखील या पत्रामध्ये दिलेला आहे. तर पुढे होत तरी काय या कडे सर्वांच लक्ष लागून आहे. 

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!