May 19, 2024

बीड मध्ये वाळू माफियांची दादागिरी,बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर टिप्पर घालण्याचा प्रयत्न..!

लोकनेता न्युज नेटवर्क

बीड :- एकीकडे सरकार राज्यात नवीन वाळू धोरण राबवण्याच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे मात्र वाळू माफियांची  दादागिरी वाढल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली की, बीडमध्ये थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर टिप्पर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. छत्रपती  संभाजीनगरहून  बीडला  येताना एका वाळू  वाहतूक  करणाऱ्या  टिप्परने  चक्क बीडच्या जिल्हाधिकारी

दीपा मुधोळ यांच्या गाडीला कट मारला. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने एक किमीपर्यंत पाठलाग केला, परंतु तो हाती लागला नाही. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील पाडळशिंगीजवळ घडली असून, याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून वाळूमाफियांची दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!