May 8, 2024

महाराष्ट्राचे दृष्टीदाता डॉ. तात्याराव लहाने यांचा जे जे हॉस्पिटला राजीनामा dr tatyarao lahane

लोकनेता न्युज नेटवर्क

मुंबई :- दुष्टिदाता म्हणून ओळखले जाणार डॉ.तात्याराव लहाने. आज पर्यंत 1 लाख 65 हजार शस्त्रक्रिया करत विक्रम निर्माण करणारे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने. यांचा जे जे हॉस्पिटला राजीनामा. राजीनामा जाहीर झाल्या बद्दल त्यांनी शासनाचे आभार देखील मानले.

         आपल्या स्वकर्तुत्वाने आपण काही गोष्टी करत असलो तर आपल्या सहकार्याची आपले थोड फार इकाव ही आपली अपेक्षा असते. डॉ. लहाने हे डोळ्याच्या शस्त्रक्रियासाठी नामांकित डॉ.म्हणून ओळखले जातात. आज त्यांना डावलून काही निर्णय घेण्यात येत असेल तर दे चुकीचं.आणि कोणताही व्यक्ती हा अपमान सहन करणार नाही.”मला अपमान सहन करून राहणं योग्य वाटले नाही. आमचे म्हणणं एकूण न घेता एकतर्फी निर्णय घेण्यात आला.. त्यामुळे डॉ. तात्याराव लहाने यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले..

          डॉ. लहाने साहेब जे जे हॉस्पीटलचे डीन असताना उपचारासाठी गावखेड्यातुन मुंबईला गेलेल्या सामान्य रुग्णांची ते योग्य प्रकारे काळजी घेत होते. हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहीलेले आहे….एका छोट्याशा खेड्यात जन्म घेऊन अथक परिश्रमाच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणातील उच्च पदवी प्राप्त करुन आपण घेतलेल्या शिक्षणाचा, कौशल्याचा गोर गरीब सामान्य लोक जे की महाग महाग हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकत नाहीत.अशा सामान्य लोकांसाठी फायदा व्हावा , दृष्टिहीन लोकांना हे सुंदर जग दाखवण्यासाठी अहोरात्र राबणार्या अशा देवमाणासाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल तर हे आपल्या सर्वांचं दुर्दैवच म्हणावं लागेल…..या महाराष्ट्रात नेहमी महान लोकांना त्रास देऊन त्यांचा मानसिक आत्मविश्वास दुखावण्याचा हेतु परस्पर प्रयत्न केला गेलेला आहे.आणि जे जे हॉस्पिटल मध्ये देखील हाच प्रकार झाला डॉ. लहाने यांना हेतूपर त्रास देण्यात आलंय असं सर्व सामान्य लोकांचं मत आहे…


        पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आज पर्यंत अनेक सर्वसामान्य जनतेचे आयुष्य वाढवण्याचे काम केलेले आहे. ज्या गराजवांन लोकांनां पैशा अभावी आपले डोळे गमवावे लागले असते अश्या लोकांना त्यांनी नवं दुष्टी देण्याचे काम केलेलं हा. राजीनामा दिला असला तरी या पुढे खाजगी रुग्णालयाद्यारे आयुष्यभर रुग्ण सेवा देणार असल्याचं डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं.

________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!