May 8, 2024

अंबाजोगाई जवळ कार अपघातात दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू car accident

लोकनेता न्युज नेटवर्क

परळी :- अंबाजोगाई – येथून आडसकडे जाणाऱ्या रोडवर कार झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात अंबाजोगाई येथील डॉ. प्रमोद राजाभाऊ बुरांडे (वय ३९) आणि डॉ. रवी संतोष सातपुते (वय ३८) यांचा मृत्यू झाला. आज शुक्रवारी(दि.०९) दुपारी १२ वाजता हा अपघात झाला.

            डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते हे दोघेही निष्णात फिजिओथेरपिस्ट होते. आडस येथील एका आरोग्य शिबिराला भेट देऊन ते कारमधून (एमएच ४४ एस ३९८३) अंबाजोगाईकडे निघाले होते. आडस ते चनई रोडवर उतारावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेच्या झाडाला धडकली. या अपघातात दोन्ही डॉक्टरांचा मृत्यू झाला. दोन उमद्या डॉक्टरांच्या मृत्यूमुळे अंबाजोगाईत हळहळ व्यक्त होत आहे.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!