May 2, 2024

महाराष्ट्र राज्य हे शांतता प्रिय संयमी आहे,हा खोडसाल पणा आहे, सामान्य जनतेच्या हिताचे नाही, जातीय तेढ निर्माण करण्याचा कट – शरद पवार

लोकनेता न्युज नेटवर्क

मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पवारांनी महाराष्ट्राला शांततेचे आवाहन केले आहे. सर्वसामान्यांना शांततेत जगू द्या, असे त्यांनी बारामतीतील पत्रकार परिषदेत सांगितले. सर्वसामान्य माणसांनी पोलिस यंत्रणेला व प्रशासनाला सहकार्य द्यायची गरज आहे, असेही ते म्हणाले.

       बारामतीमध्ये स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून पवारांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, “राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर हे महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. याठिकाणच्या सर्वसामान्य लोकांची कायदा हाती घेण्याची प्रवृत्ती नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही आवाहन आहे, की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घ्या.”असे प्रतिक्रिया व्यक्त & आव्हान केले आहे.

प्रतिनिधी|विजय रोडे

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!