May 9, 2024

तुपकरांच्या आंदोलनाच्या इशार्‍याला घाबरून “पीकविमा” कंपनीने बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकर्‍यांना दिले उर्वरित 70 कोटी pikvima

लोकनेता न्युज नेटवर्क

बुलढाणा :- जून चालू होऊन 10 ते 12 दिवस झाले असून देखील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पीक विमा कंपनीने उर्वरित रक्कम दिलेली नव्हती. 15 जून पर्यंत राहिलेल्या शेतकर्‍यांचा पीक विमा कंपनीने जमा केला नाही तर, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सोबत घेऊन मुंबई येथे आंदोलन करू असे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रोखठोक विमा कंपनीला व प्रशासनाला कळवले होते. 

             तुपाकरांच्या आंदोलनाची धास्ती खात विमा कंपनीने त्वरित बुलढाणा जिल्ह्यातील शेतार्‍यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास चालू केले. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी उर्वरित विमा मिळाल्याने आनंदात असल्याच दिसून आल. संपूर्ण विम्याची रक्कम मिळाल्याकारणाने शेतकर्‍यांनी व कार्यकर्त्यांनी रविकांत तुपकर यांचा 15 जून रोजी त्यांच्या बुलढाणा येथील संपर्क कार्यालयामध्ये जल्लोषात सत्कार करण्यात आला. रविकांत तुपकर हेच शेतकर्‍यांचे नेते आहेत असे जिल्हाभरातील शेतकरी म्हणत असल्याच येकायला मिळते. बाकी बुलढाणा जिल्ह्यामधील

 कोणत्याही नेत्यांनी शेतकर्‍यांसाठी आवाज उठवल्याच तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी आंदोलने केल्याच शेतकर्‍यांनी सांगितलेलं नाही. 

       उर्वरित 70 कोटी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळून दिल्या बद्दल सर्व क्षेत्रातून रविकांत तुपकरांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!