May 8, 2024

अंगावर काटा आनणारा काळा दिवस :-डॉ.अक्षय गुठे

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा :- समृद्धी महामार्ग वर झालेल्या अपघाता मधिल प्रत्यक्ष दर्शनी यानी सागितली घटना रुग्णवाहिकेचा कॉल आला. माझा मुळ गाव हे पिंपळखुटा असल्यामुळे मि गावातील रहिवाशी व्यक्तीना फोन करुन विचारणा केली आसता असे समजले कि ट्रैवल मधे ३० प्रवाशी असुन 5 प्रवाशी बाहेर पडले आहे बाकी भयावह अग्नी मधे आत अडकलेले आहे. त्यानंतर आम्ही लगेच बाकी ऐम्ब्युलन्स ला संपर्क करुण तेथे पोहचलो बस मधे प्रवाशी होरपळत होते पण आत कोणताच आवाज नव्हता. आग एव्हड्या मोठ्या प्रमाणात होती कि घटना नंतर अग्नी वर नियत्रंण मिळवायला जवळ २ तास उलटुन गेले.

         जखमीवर उपचार करुन त्याना ग्रामीण रुग्नालय सिंदखेडराजा ला हलवण्यात आले
माझ्या समोर १५ प्रवाशी बस मधुन बाहेर काढले असता मोठ्या प्रमाणा जळाल्यामुळे स्त्रि आहे कि पुरुष ओळखणे कठिन होते. नामक व्यक्ती संदिप मेहत्रे यानी एक छोट्या बालकाची जळलेली बॉडी बस मधुन बाहेर काढली साधारण त्याचे वय ४ किवा ५ असेल त्या प्रसंगी एव्हड्या मोठ्या प्रमाणात आश्रुचा कंठ फुटुन आला नंतर अधिकारी उच्च स्थरावरील पोलीस याचा ताफे पोहचले. मंत्री ,आमदार, सामाजिक कार्यकर्ते ,हे घटनास्थळी मदती साठी पोहचले.

         सदर मृतक सर्व व्यक्ती ऐम्ब्युलन्स मधे टाकत आम्ही देऊळगावराच्या च्या दिशेने निघालो व तेथुन जिल्हा रुग्णालय बुलढाना या ठिकाणी शवविछेदणासाठी नेऊन सोडले. सदर प्रसंगामधे मि तिथे असल्यामुळे माझ्या नंबर चा कसा प्रसार झाला माहित नाही मला वर्धा , करंजा. नागपुर या ठिकाण्यावरुन नातेवाईक मंडळीचे फोन चालु झाले माझी आई जिवंत आहे का त्या मधे माझी बहिण होती असे कपडे घातलेले व्यक्ती होती. पण घटना एव्हडी भयानक होती कि जळाल्यामुळे ओळख पटने शक्य नव्हते. या सर्व प्रसंगा मधे आगी चे चटके खाण्यापासुन तर बाहेर काढण्यापर्यत अग्नीशामक कर्मचाकी वर्ग , १०८ ऐम्ब्युलन्स पायलट , डॉक्टर , सिंदखेडराजा टोलवेज चे कर्मचारी , सिंदखेडराजा व देऊळगावराजा पोलीस वर्ग, नामक व्यक्ती बुद्दु चौधरी , संदिप मेहेत्रे उपस्थीत सर्व १०८ डॉक्टर वर्ग यानी सर्वपतोरी प्रयत्न करुन त्याना बाहेर काढले.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!