May 8, 2024

गणरायाच्या स्वागतासाठी कवठेमहांकाळ नगरी सज्ज

लोकनेता न्युज नेटवर्क

सांगली/सनी लोंढे :- विघ्नहर्त्या गणराच्या आगमनासाठी कवठेमहाकाळ नगरी सज्ज झाली आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सजावटीचे साहित्य खरेदीसाठी छत्रपती शिवाजी बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती श्री मुर्ती नोंदणी करण्याबरोबरच खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.उद्या मंगळवारी दि. १९ सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात मुख्य रस्त्यासह अनेक ठिकाणी श्री मुर्तीचे स्टॉल लागले आहेत. स्टॉलवर घरगुती श्री मुर्ती नोंदणी करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. गतवेळच्या तुलनेत यंदा श्री मुर्तीच्या किंमतीमध्ये मोठी दरवाढ बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. तर अद्याप काही मंडळांचे मंडप उभारणीचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. अनेक सार्वजनिक गणेश मंडळांकडून आकर्षक तसेच विविध रूपातील भव्य दिव्य गणेशमुर्ती आणण्यावर भर दिला जातो. यामध्ये अनेक मंडळांकडून बाहेरगावाहून श्री मुर्ती आणल्या जात आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्तीचे स्टॉल लागले आहेत. अशाच एका स्टॉलवर ‘श्री’ मूर्ती नोंदणी करताना भाविक.छत्रपती शिवाजी चौक बाजारपेठ फुलून गेली आहे.

 

           नवीन बस स्थानक हरी विजय चौक थबडेवाडी चौक जत रोड तसेच अन्य ठिकाणी श्री मुर्तीींचे स्टॉल तसेच सजावटीच्या वस्तूंची दुकाने सजली आहेत. सोमवार असल्याने अनेक नागरिक सहकुटुंब सहपरिवार खरेदीसाठी सायंकाळी बाहेर पडल्याचे दिसत होते.त्यामुळे रस्ते गर्दीने फुलले होते सजावटीच्या साहित्याचे स्टॉल तसेच दुकानांमध्ये गर्दी दिसून येत होती.आकर्षक तसेच विविध रूपातील श्री मूर्ती नोंदणीसाठी देखील स्टॉल्सवर रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती. लालबागचा राजा, बालगणेश, शंकराच्या रूपातील, विष्णु अवतार, सिंहासनावरील, मोरावरील अशा नाविन्यपूर्ण रुपातील गणेशमूर्ती भाविकांना आकर्षित करताना दिसत होत्या.

        सजावटीच्या साहित्यामध्ये विविध नमुन्यातील रंगीबेरंगी तोरण, मोत्यांचे हार, पाना-फुलांच्या माळा, विविध प्रकारचे आणि आकाराचे मखर, कापडी मंडप, पडदे, फोम विविध नमुन्यातील लायटींगच्या माळा, झुंबर यासह नानाविध वस्तूंची बाजारात मोठी रेलचेल दिसून आली.

___________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!