May 2, 2024

बैल पोळा

लोकनेता न्युज नेटवर्क

बैलांचा उत्सव |
आज बैलपोळा ॥
बैल होती गोळा ।
आनंदाने ॥

शेतकरी राजा ।
झाला आनंदित ॥
सर्जा राजा गीत ।
गात असे ॥

कृषी जीवनात ।
श्रावण हा मास ॥
बैलपोळा दिस ।
आनंदाचा ॥

सर्जाराजा जोडी ।
शोभून दिसते ॥
आनंदात न्हाते ॥
शेतकरी ॥

व्यक्त कृतज्ञता ।
कृषक करती ॥
शृंगार करती ।
आनंदाने ॥

बैल शृंगारली ।
शिंग रंगविली ॥
झूल पांघरली ॥
सर्जा राजा ।

बैल पोळ्याच्या या ।
हार्दिक शुभेच्छा ॥
मनस्वी सदिच्छा ।
ग्रामनाथा ॥

संत कबीर कविराज
राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

अभंगकार
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर , अमरावती.
भ्र.ध्व. :८०८७७४८६०९

About Post Author

error: Content is protected !!