अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांच्या ' डॉ.गजानन गुल्हाने 'या अभंगाच्या गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध
"विद्यापीठातील डॉ.गजानन गुल्हाने यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन
लोकनेता न्युज नेटवर्क
अमरावती :- “सत्कारमूर्ती डॉ.गजानन गुल्हाने सरांनी इतक्या कमी वर्षाच्या कालावधीत पंचवीस विद्यार्थ्यांचे गाईड होऊन मार्गदर्शन केले त्याबद्दल खरोखरच संशोधनातील उत्कृष्टतेचे हे उदाहरण आहे व शैक्षणिक संशोधनाची सुंदरशी बाग निर्माण करून त्यांनी समाजाला अर्पण केली म्हणूनच संशोधनाची बाग फुलविणारे ते एक आदर्श संशोधक आहेत. संशोधनाप्रती त्यांना खूप तळमळ होती कारण इतक्या कमी कालावधीमध्ये इतके जास्त विद्यार्थी हे कदापी शक्य नाही.सरांच्या मार्गदर्शनातून मिळालेल्या प्रेरणेमुळेच हे होऊ शकले.सरांच व्यक्तिमत्व शिक्षण विभागातील एक योग्य व्यक्तिमत्व आहे.भविष्यातील सतकार्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी सरांना शुभेच्छा.”असे विचार प्राचार्य डॉ. सुहास पाटील यांनी व्यक्त केले. ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण विभागामध्ये कार्यरत असलेले शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गजानन गुल्हाने यांच्या हॉटेल ग्रेस इन ,अमरावती येथे दि.१ऑक्टोबर २०२३ ला सेवा निवृत्तीच्या निमित्ताने संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्यामध्ये अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते .
सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पाटील,प्रमुख अतिथी सदस्य,व्यवस्थापन परिषद बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथील मा.डॉ.साहेबराव भूकन,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.वसंतराव जामोदे,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉ.व्ही.बी.निमजे,जळगाव विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य,प्राचार्य डॉ एम.एल.नानकर होते तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख,डॉ.गजानन गुल्हाने यांच्या परिवारातील सर्व सदस्य त्यांच्या पत्नी सौ.नीता गुल्हाने, वडील बंधू श्री नरेंद्र गुल्हाने, जावई श्री अमर शहाडे व मुलगी सौ.नेहा शहाडे व इतर कुटुंब सदस्य,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संपूर्ण बी.एड.चे आजी माजी प्राचार्य, प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती.
सत्कार सोहळ्याचे उदघाटन मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केले.सर्वप्रथम अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी स्वरचित ” डॉ.गजानन गुल्हाने ” या अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून डॉ.गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनामध्ये तयार झालेल्या एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले,या सर्व विद्यार्थ्यांनी सरांच्या या सत्कार सोहळ्याचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले. सर्वप्रथम या सर्व विद्यार्थ्यांचा डॉ.गजानन गुल्हाने यांनी सत्कार केला.त्यानंतर श्री बाळापुरे, भटकर दादा व पंकज शर्मा यांचा सत्कार सरांनी केला. डॉ.गजानन गुल्हाने व त्यांच्या सुविध्य पत्नीसह सत्कार पीएचडी धारक विद्यार्थ्यांनी केला.पदव्युत्तर शिक्षण विभागातील सर्व सहकारी कर्मचारी,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीतील सर्व सहकाऱ्यांनी,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांत कार्यरत असलेल्या सर्व बीएड कॉलेजच्या प्राचार्यानी सरांचा सत्कार व गुणगौरव केला.
“डॉ.गजानन गुल्हाने शिक्षणातून संशोधनाची प्रगती करणारे संशोधक” – माजी कुलगुरू डॉ.वसंतराव जामोदे
प्रमुख अतिथी माजी कुलगुरु डॉ.वसंतराव जामोदे म्हणाले की,”डॉ.गजानन गुल्हाने यांनी शिक्षणातून संशोधनाची असमान्य प्रगती केली त्यामुळेच आज 25 विद्यार्थी सरांचे पीएचडी झालेले आहेत व आज समाजात संशोधन कार्य करीत आहेत हे गौरवस्पद आहे.सरांनी आपल्या शैक्षणिक कालखंडामध्ये एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून नेहमी कार्य केले.”
” डॉ.गजानन गुल्हाने एक
गणित प्रेमी”
-डॉ.एम.एल.नानकर
प्रमुख अतिथी डॉ.एम.एल.नानकर सरांनी,” डॉ.गजानन गुल्हाने हे सर गणित प्रेमी होते,त्यामुळे गणितातील चिकित्सक बाबींची त्यांनी जीवनामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी करून वेळेला व कार्याला नेहमी महत्त्व देऊन मार्गदर्शन करून विद्यार्थी घडविले.”
“शैक्षणिक संशोधनाबद्दलची डॉ. गजानन गुल्हाने यांची पुस्तके मार्गदर्शक” – प्राचार्य डॉ.साहेबराव भूकन
जळगाव विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.साहेबाराव भूकन सरांनी ,” डॉ.गजानन गुल्हाने यांच्या शैक्षणिक जीवनातील संशोधन कार्याचे महत्त्व सांगून विविध विद्यापीठांमध्ये सरांनी केलेल्या कार्याचा गौरव केला पाहिजे असे त्यांचे कार्य आहे.शैक्षणिक संशोधनाबद्दल सरांनी लिहिलेल्या विविध पुस्तके विविध विद्यापीठातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहेत त्याचबरोबर सरांच्या अधिपत्याखाली अमरावती विद्यापीठाची पदव्युत्तर शिक्षण विभागाने कमालीची प्रगती केली.”
“संघर्षावर मात करून उच्च पदावर पोहोचलेले माझा बंधू डॉ.गजानन “
-श्री नरेंद्र गुल्हाने
सत्कारमूर्तींचे थोरले बंधू श्री नरेंद्र गुल्हाने म्हणाले की,माझा धाकटा बंधू गजानन जीवनात संघर्ष करून गृहस्थ जीवनातून सामाजिक व शैक्षणिक जीवनात प्रवेश करीत असताना सर्व अडचणींवर मात करून उच्च पदापर्यंत पोहोचला याचा आम्हाला अभिमान आहे.
” डॉ.गजानन गुल्हाने एक आदर्श मार्गदर्शक”
– प्रा.अरुण बुंदेले
अभंगकार व साहित्यिक प्रा. अरुण बुंदेले म्हणाले की,”संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शिक्षणशास्त्र पदव्युत्तर विभाग प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झालेले डॉ.गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनामुळे आज पंचवीस विद्यार्थी आचार्य झाले.खऱ्या अर्थाने डॉ.गुल्हाने हे आदर्श मार्गदर्शक ठरले कारण गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय विद्यार्थी घडू शकत नाहीत.शैक्षणिक संशोधनातील बदलांचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करण्याच्या छंदामुळे डॉ.गुल्हाने यांना विद्यार्थी घडवण्यासाठी खूप उपयोग झाला.”
“विद्यार्थी हेच माझे दैवत” – डॉ.गजानन गुल्हाने
सत्काराला उत्तर देताना डॉ.गजानन गुल्हाने यांनी सांगितले की ,” मी हातचं कधी राखलेलं नाही जे काही केलं ते विद्यार्थ्यांना दैवत समजून पूर्णपणे देण्याचा व त्यांना घडविण्याचा प्रयत्न केला तसेच माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये विविध संशोधन कार्य करीत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला.विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनासाठी नहमी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सतकार्याची भूमिका घेतली.दुसरी इनिंग म्हणजेच सेवानिवृत्तीनंतर सुद्धा सामाजिक बाबी ज्या राहिल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमी नक्कीच करेल.”
“डॉ.गजानन गुल्हाने एक प्रभावी व्यक्तिमत्त्व”- प्राचार्य डॉ.गजानन शर्मा
सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक करताना चोपडा महाविद्यालय खामगाव येथील प्राचार्य डॉ. गजानन शर्मा म्हणाले की ,”डॉ. गजानन गुल्हाने सरांच्या शैक्षणिक ज्ञानवृद्धीमुळेच आम्ही ज्ञान वाटू शकतो.सरांचं व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावी आहे म्हणूनच ते मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना घडू शकले.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.कुकडपवार मॅडम यांनी केले तर आभार डॉ .दीपक जयस्वाल यांनी मानले.
सत्कार सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डॉ . गजानन गुल्हाने सर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले
25 शिक्षण आचार्य पदवीधारक विद्यार्थी व पदव्युत्तर शिक्षण विभागातील सहकारी सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
__________________________
buy zithromax 500mg pill – order nebivolol 20mg order bystolic 20mg online cheap
order omnacortil 20mg generic – generic prometrium oral progesterone 100mg
buy neurontin 600mg generic – order generic neurontin 800mg purchase itraconazole online
lasix 100mg pill – order nootropil 800 mg pill betnovate cream
buy tizanidine 2mg sale – order hydrochlorothiazide 25mg hydrochlorothiazide online
cialis 10mg over the counter – cialis 5mg cost viagra 25mg for sale
sildenafil pill – cialis from canada buy tadalafil 40mg sale