लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा :- तालुक्यातील हनवतखेड येथे महाशिवरात्री निमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आठव्या दिवसाची सेवा ह भ प श्री प्रेमानंद महाराज देशमुख यांची हरीकीर्तनाची सेवा पार पडली.
नंदाच्या घराला
मज नेई गौकुळाला
या अभांगवर बोलत असताना भगवान श्री कृष्णाने आपल्या सवंगड्यान सोबत गौकुळात केलेल्या काल्याची महिमा त्यांनी आपल्या गोडवाणी तून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
आयुष्यात आपले आई वडील हेच आपले सर्व प्रथम दैवत आहे. आई वडिलांची सेवा करा परमार्थ हा आपल्या घरीच आहे. परमार्थ करायला लाजू नका. परमार्थ करण्यासाठी कुठ जायची गरज नाही आहे तिथून आपण भगवंताचे चिंतन करू शकतो. आई वडिलांची सेवा करा, व्यसनाच्या व्याधीन जाऊ नका. स्वतःच अस्तित्व स्वतःच सिद्ध करा. लोक काय म्हणतील या कडे लक्ष न वेधता आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू ठेवा. असे मोल्यावन समजा प्रमोधनाच काम त्यांनी आपल्या अमृत वाणीतून तरुणांना केले.
संपादक|ज्ञानेश्वर बुधवत
___________________________________
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.