May 20, 2024

ॲड. विजयकुमार कस्तुरे ‘चिखली’ यांना ‘मानद डॉक्टरेट’ प्रदान

लोकनेता न्युज नेटवर्क

चिखली :- येथिल रहिवासी ॲड. विजय कुमार कस्तुरे यांना त्यांच्या आजवरच्या सामाजिक समर्पित कार्यासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटन नई दिल्ली यांच्या आवाहनानुसार साऊथ वेस्टर्न अमेरीकन विद्यापिठाच्या तर्फे मानद डॉक्टरेट – डॉक्टर ऑफ सोशल वर्क – अशी पदवी प्रदान करण्यात येवून त्यांना विद्या पिठाच्या वतीने चेन्नई येथे आयोजित पद्‌विदान समारंभामध्ये सन्मानित करण्यात आले ‘ . या समारंभात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या इतरही बऱ्याच मान्यवरांचे कार्यानुसार मानद डॉक्टरेटने तसेच सन्मान्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .l विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे समारंभाच्या प्रारंभी सर्व पुरस्कारार्थी मधून ॲड. कस्तुरे यांचा ‘ विद्यापीठ प्रतिनिधीच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छाने सत्कार करण्यात येवून त्यांना पदवी प्रदान होता क्षणी सर्व पदवी प्राप्त मान्यवरांच्या वतीने बोलण्याची व सत्कार मुर्ती या नात्याने विचार व्यक्त करण्याची विनंती आयोजक कांच्या वतीने करण्यात आली . त्यानुसार ॲड. कस्तुरे यांनी सदर विचार पिठावरून आपले विचार व सद भावना व्यक्त केल्या .
तसेच समारभाचे अध्यक्ष ‘ तथा प्रमुख अतिथी व विद्यापिठ प्रतिनिधी यांचेसह विचार पिठावर विराजमान होण्याचा सन्मान ही प्रदान करण्यात आला . हा संपूर्ण सोहळा संबधीत विद्यापिठाच्या वतीने व त्यांच्या सन्मान निय प्रतिधिनिधी च्या व निमंत्रीत मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला . सदर कार्यकमात केंद्रीय मानवाधिकारचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘ मा . डॉ.मिलींद दहिवले तसेच स्थानिक राज्यसरकार चे प्रतिनिधी ‘ चित्रपट सृष्टीतील नामवंत निर्माते – लेखक – तसेच देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर तथा विशेष म्हणजे रशिया मधून निमंत्रित मॅडम – ज्युली याना यांचे सह केंद्रीय मानवाधिकार चे इतर राज्यातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .

__________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!