लोकनेता न्युज नेटवर्क
लोणार :- शहारातील मंठा रस्त्यावर जुन्या वादातून 20 वर्षिय तरुणाला चाकुने भोकसल्याची घटना ९ जुलै रोजी रात्री अंदाजे ९वाजे दरम्यान घडली.शहरातील मंठा बायपास रस्त्यावर असलेल्या तेजस वाईनबार वर मृतक रितेश सुनिल मापारी वय २० हा मित्रासह जेवन करीत असताना आरोपी शुभम नारायण मापारी वय २२ रा.लोणारआरोपी उदय विनोद सातपुते वय २३ या.लोणार आरोपी विशाल भारस्कर रा.गारटेकि ता.मंठा यांचा जुन्या भांडनातुन वाद झाला होता.तेजस वाईनबार येथे शाब्दिक चकमक होउन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.मृतक रितेश सुनिल मापारी यास.आरोपी शुभम नारायण मापारी व आरोपी उदय विनोद सातपुते यांनी हात पकडून ठेवले व आरोपी विशाल सुभाष भारस्कर यांने त्याच्या पोटात चाकुने भोकसुन वार केला.त्यानंतर त्याला जख्मी अवस्थेत नागरिकांनी मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखविले पण गंभीर जख्मी झाल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथील दवाखान्यात नेण्यात आले.पण तो मृत पावल्याने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.मृतकाचे वडील सुनिल साहेबराव मापारी वय ४८ या.लोणार यांचे फिर्यादी वरून वरील तिन्ही आरोपी विरुद्ध भांदवि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार निमिष मेहेत्रे.पोलीस कर्मचारी संजय जाधव बिट जमादार संतोष चव्हाण.गणेश लोढे अनिल शिंदे यांनी घटनास्थळावर धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणली व तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते.
प्रतिनिधी|विनायक कुटे
__________________________
संबधित बातम्या
सावखेड तेजन येथील जनता विद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
ई-पिक पाहणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
दोन किलो सोन्याच्या नाण्याचा मोह ; मास्तरीनबाईला चक्क साडे 9 लाखाचा चुना