May 8, 2024

” डॉ.शरद प्रभाकरराव इंगळे यांनी दुर्बिणद्वारे ऑपरेशन करून गर्भातील अर्भकाला मिळवून दिले जीवनदान “

लोकनेता न्युज नेटवर्क

नागपुर :- एकाच वेळी दोन गर्भधारणा झालेल्या एका महिलेच्या जीवनातील हा वास्तव प्रसंग . प्रस्तुत महिलेची गर्भधारणा ही टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेद्वारे झालेली होती आणि यात महिलेस अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारची गर्भधारणा झाली. यात एकाच वेळी एकाच महिलेला दोन गर्भधारणा झाल्या . एक गर्भधारणा गर्भाशयात आणि दुसरी गर्भधारणा गर्भनलिकेत झाली होती . ही गर्भधारणा तज्ज्ञ डॉ. शरद इंगळे यांना सोनोग्राफीद्वारे तपासण्यात आढळून आली.

     अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत Heterotopic pregnancy म्हणतात आणि ही अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे.या अवस्थेत गर्भ नलिकेतील गर्भावस्थेमुळे महिलेच्या जीवाला धोका निर्माण होतो. गर्भ नलिकेतील गर्भ गर्भपात होऊन अतिरक्तस्राव होतो त्यामुळे महिलेचा आणि तिच्या गर्भातील अर्भकाचा जीव धोक्यात येतो पण दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया करून डॉ . शरद इंगळे यांनी गर्भ नलिकेतील गर्भ अलगद वेगळा केला आणि गर्भाशयातील वाढणारा गर्भ आणि महिला यांचे स्वास्थ्य सुखरूप करून या दोघांना जीवनदान मिळवून दिले .डॉ . शरद इंगळे ( MBBS, DNB, DGO, FRM, DRM ) हे प्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ज्ञ तसेच निष्णात दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहेत. आज पर्यंत त्यांनी सात हजारहून अधिक रुग्णांवर गंभीर अशा गर्भाशयाच्या आजारासाठी यशस्वीरित्या दुर्बिन शस्त्रक्रिया केलेल्या आहेत तसेच १००० हून अधिक वंध्यत्व जोडप्यांना टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेद्वारे संतती प्राप्त करून दिलेली आहे. त्यांच्या या वैद्यकीय सेवेसाठी त्यांना सन : २०१९ ला केरळ राज्यात कार्यरत असताना सर्वोत्कृष्ट वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून आरोग्यमंत्री (केरळ राज्य)
यांच्याकडून गौरवण्यात आले आहे.डॉ .शरद इंगळे यांचे जन्मगाव अचलपूर , जि .अमरावती असून आज नागपूर स्थित रामदास पेठ येथे समर्था फर्टिलिटी व फिटल मेडिसिन सेंटर येथे आपली वैद्यकीय सेवा देतात तसेच ते महिन्याच्या दुसऱ्या रविवारी अमरावती आणि अचलपूर येथील वंधत्व तसेच गर्भाशयाच्या आजाराशी निगडित रुग्णांना रुग्ण सेवा प्रदान करतात.

संपर्क : – मो .नं.9967778041,6378691741

संकलन
प्रा .अरुण बाबारावजी बुंदेले,

About Post Author

error: Content is protected !!