May 9, 2024

सावखेड तेजन येथे श्री संत भगवान बाबा पुण्यतिथि निम्मित अखंड हरिनाम सप्ताह व आरोग्य शिबीर संपन्न

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा :- महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे याचं भूमीत अनेक संत होऊन गेले. महाराष्ट्र एक आदर्श समाजसुधारक संत भगवान बाबा होऊन गेले. जमिन विका पण मुल शिकवा, शिक्षण हेच आपल्या जीवनाची रूपरेषा बदलवू शकते. असा उपदेश त्यांनी समाजाला केला.
      मातृतीर्थ सिंदखेड राजा मधील सावखेड तेजन हे गाव प.पु.श्री संत भगवान बाबांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. येथे गेल्या ५५ वर्षा पासून भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा निम्मित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. वडीलधाऱ्या माणसांनी ज्या नीतीनियमाने या सोहळ्याची परंपरा सुरू ठेवली, आणि पंचकृषी मध्ये गावाचे नावलौकीक केलं. “संत येती घरा’ तोच दिवाळी दसरा” अशाम्हणी प्रमाणे आज तरुणांच्या नियोजनात उत्सवात बाबांची पुण्यतिथि मोठ्या थाटात साजरी झाली. नव्हे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संत भगवान बाबांची पुण्यतिथि मोठ्या संख्येने साजरी केल्या जाते.

            भगवान बाबांचा पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटपाचा कार्यक्रम देखील गावकऱ्यांनी आयोजीत केला होता. या साठी मधुमेह व हृदयविकार तज्ञ डॉ.सुहास विघ्ने, अस्तिरोग तज्ञ डॉ. अमोल वाघ व डॉ. रोहित दराडे हे उपस्थित होते. या मध्ये 240 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. गावातील डॉ. नंदकिशोर बुधवत, डॉ. शिवानंद जायभाये, डॉ. अक्षय विघ्ने व नवतरुण/तरुणींचे शिबिरासाठी सहकार्य लाभले.

         सावखेड तेजन येथे भव्यदिव्य अशा मंदिरांची काम गावकऱ्यांनी पूर्ण केले. या कामाला गावकऱ्यांनी सहकार्य देखील तितक्याच उत्सुकतेने केले. आणि पुनश्च एकदा बाबांच्या आशीर्वादाने मंदिरांच्या 64×60 सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन भाजपा प्रवक्ते विनोद वाघ त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गावातील भगवान बाबांचा सहवास ज्यांना लाभला असे वयोवृध्द मंडळी,गावातील नवतरुण, व संत श्री भगवान स्वयंसेवक मंडळ उपस्थित होते.

About Post Author

error: Content is protected !!