May 9, 2024

सत्य, पाहिले….!

This get from this site or source

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

काळजात दगड मी….
फुटतांना पाहिले आहे…!

जात्यात खडे मी…
रंडतांना पाहिले आहे…!

तो,फुलात गंध मी…
जहरात, पाहिले आहे…!

प्रेमात सारे मी…
वैरात पाहिले आहे…!

आरशात,चेहरे मी…
असत्य,पाहिले आहे…!

माझेच,वैरी मी….
श्वासात पाहिले आहे…!

कटात जगलो मी…
थाठात, पाहिले आहे….!

होतांना असे मी….
जातांना,पाहिले आहे…!

असंख्य शोधले मी…
शून्यात, पाहिले आहे..!
……..……………….
बबनराव वि.आराख
गागलगाव.
7875701806

_____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!