May 8, 2024

प्रा.वा.ना.आंधळे यांची कविता मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

लोकनेता न्युजनेटवर्क

एरंडोल :-  येथील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना.आंधळे यांच्या ‘फर्मान’ या काव्यसंग्रहातील “मराठी माती” ही कविता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला व द्वितीय वर्ष विज्ञान या दोघी वर्गांच्या तिसऱ्या सत्रासाठी जून २०२३ पासून लागू करण्यात आली आहे.
     गेल्या चार दशकांपासून अव्याहत काव्य लेखन-प्रकाशन करणाऱ्या प्रा.आंधळे यांचे अभ्यासक्रमात बऱ्यापैकी योगदान आहे. यापूर्वी कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. ए. मराठी द्वितीय वर्ष या वर्गासाठी त्यांच्या पंधरा मराठी गझल अभ्यासक्रमात येऊन गेल्या. मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला या वर्गासाठी असलेल्या संपादित काव्यसंग्रहात त्यांच्या कवितेचा सहभाग होता. महाराष्ट्र शालेय अभ्यासक्रमाच्या बालभारती इयत्ता ३री व युवकभारती इयत्ता ११वीत देखील त्यांच्या कविता अभ्यासल्या गेल्या आहेत तसेच गुजरात शालेय अभ्यासक्रमात इयत्ता ४थी साठी त्याची बालकविता सध्या अभ्यासक्रमात आहे.
      सन २०२२ व २०२३ या वर्षांत त्यांनी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अनुक्रमे नाशिक व कन्नड येथे भूषविलेय. त्यांच्या भरीव काव्यलेखनाची दखल अभ्यास मंडळांनी वेळोवेळी घेतल्याचे समाधान रसिक वाचकांनी नोंदवत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!