May 9, 2024

“जिजामाता माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जिजामाता जयंत्युत्सव व स्नेहसंमेलनाचे आयोजन”

This get from this site or source

मा .आमदार श्री देवेंद्रजी भुयार व मा .श्री हेमंतजी काळमेघ (कार्यकारिणी सदस्य,श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती) यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंत्युत्सवाचे उद्घाटन

लोकनेता न्यूज नेटवर्क

मोर्शी  :-  विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था, येरला ता.मोर्शी द्वारा संचालित जिजामाता माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,मोर्शी,जि.अमरावती येथे दि .१०जानेवारी ते १३जानेवारी २०२३ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
      दि.१० जानेवारीला परिसर स्वच्छता,वर्ग सजावट,खेळ व क्रीडा स्पर्धा,आनंद बाजार तर दि .११ जानेवारी २०२३ ला गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा , परिमल हस्तलिखिताचे प्रकाशन आणि जिजामाता जयंती उत्सव व स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मा.आ. श्री देवेंद्रजी भुयार (आमदार,मोर्शी विधानसभा मतदारसंघ ) हे करणार असून कार्यक्रमाध्यक्ष मा .सुहासराव ठाकरे (अध्यक्ष,विदर्भ समाज कल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था , येरला,ता.मोर्शी )हे करणार आहेत . प्रमुख अतिथी मा .हेमंतजी काळमेघ ( कार्यकारिणी सदस्य ., श्री शिवाजी शिक्षण संस्था , अमरावती ) ,डॉ.प्रवीणजी चौधरी (बालरोग तज्ज्ञ, वरुड ),श्रीमती उज्ज्वलाताई ढोले ( गटविकास अधिकारी,पंचायत समिती,मोर्शी)श्रीमती संजनाताई इंगळे (तालुका कृषी अधिकारी , मोर्शी ),प्रा.डॉ.रविकांत कोल्हे (इंडिपेंडंट डायरेक्टर गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया),मा.निलेशजी ठाकरे ( उद्योजक व अध्यक्ष स्व.मथुराबाई प्र.ठाकरे चॅरिटेबल ट्रस्ट,अमरावती) हे राहणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये विदर्भ समाज कल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था येरला ता.मोर्शी या संस्थेचे सर्व पदाधिकारी राहणार आहेत .”स्फूर्तीदायिनी माँ जिजाऊ साहेब ” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आहे .
      दि .१२ जानेवारी२०२३ ला “राष्ट्रमाता माँ जिजाऊ स्मृती प्रभात फेरी “चे उद्घाटन मा.सचिन पवार साहेब (प्र.ठाणेदार पोलीस स्टेशन,मोर्शी ) हे करणार आहेत तर दि . १३ जानेवारीला विविध प्रकारातील नृत्य,”मी सावित्रीबाई फुले बोलते.” व “मी राजमाता जिजाऊ बोलते.” हे एकपात्री प्रयोग , नाट्यछ्टा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड. श्रीमती लीनाताई योगेशजी धोटे (हिवरखेड ) या करणार आहेत ,असे प्राचार्या श्रीमती एम.डी.मुळे ,एस.व्ही. सवाई
,डी.बी.जावळे,कु.जे.पी. पद्मने,
ए.एम.गावंडे,आर.जी.कोटांगळे ,
कु.के.एस.काळबांडे,बी.एन.भारती,
कु.यु.बी.ढोकणे, कु.एस.वाय.
अजमिरे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

______________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!