May 9, 2024

आयुष्यात आपल असत तरी कोण?

लोकनेता न्युज नेटवर्क

        एका सुंदर दिवसाची काळोख रात्र होती सर्वत्र अंधार पसरलाय आकाशात चांदण्याच चमकन, अशातच एका छोट्याशा प्रश्नांन मनात गोंधळ घालून झोप स्तब्ध केली त्याचं काय प्रश्नच छोटा आहे की आयुष्यात आपलं असतं तरी कोण, कोण असतं आपलं एका विशिष्ट नजरेने आपण याकडे बघितलं तर अन्य विचार बाजूला होतील, आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांकडे हट्ट करत असतो. पण का? कधी विचार केलाय का की रात्र दिवस आपण कष्ट करतो. ते केवळ इतरांसाठी स्वतःसाठी काय? ज्यांना आपण आपलं म्हणतो ते केवळ आपलेच असतील का. असे अनेक प्रश्न निर्माण करणारा एक छोटोसा प्रश्न, आयुष्यात आपल असत तरी कोण.?
        एका अरुंद रेल्वेच्या पट्टेरी प्रमाणे माणसाचा आयुष्य असत. जस की पट्टरी वर अनेक ट्रेन येतात जातात. पण जी थांबते ती आपल्यासाठी असते. तर असच आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात जातात किंबहुना काही थोड्या काळापर्यंत थांबतात देखील. पण ते चालते झाले की परत प्रश्न निर्माण होतोच ना की, आपल आहे तरी कोण.?

        ज्या वेळेस कैलासपती महादेवाने रावणाला सोन्याची लंका दान केली, आणि रावणाने अमर होण्याचे वरदान भगवंताकडून घेतले, त्यानंतर रावणाने स्वतःला देव समजले, पण म्हणतात ना सत्ता असेल तर शहाण पण येतं तसेच पैसा असेल तर माणसाला मोठेपण नक्कीच येते. हे आपण अनुभवातून सांगू शकतो.
‌        सर्वप्रथम तर या जगात आपली म्हणावी इतकी जवळची नाती कोणती उरली नाही. आणि जे उरली ती आपण पैशांच्या अहंकारांवर गमवतात कमी नाही. आपले वाटणारे आपले नसतात हे नक्कीच आणि जे आपले असतात ते कधी आपण ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही. आपल्या भावनांना दुःख पोहचवत नाही. संपत्तीच्या जोरावर सर्वजण माणसं कमवत असतात. पण जो पर्यंत संपत्ती पैसा आपल्याजवळ आहे तोपर्यंत सर्व आपलेच आहे. जग हे पैशावर प्रेम करत. किंबहुना माणसावर नाही, पैसा असेल तर सर्व माणस आपली असू शकते. जे संपत्ती न बघता प्रेम करतात ते क्वचित असतात. आणि पैसा कडून जोडली गेलेली नाती, माणसं जास्त काळ टिकत नाही. सत्ता गेली की शहाणं पण जात, तसेच पैसा गेला की त्यापासून आपण जोडलेले माणसे देखील जातील.
        विश्वासाची नाती टिकून राहतात पण, अतिविश्वासाची नाती कुठेतरी ठेच पोहोचवतात. या जगात बघायला मिळतं की आपल्या सोबत बसणारे उठणारे एका ताटात जेवणारेच माणसं गद्दार होतात. स्वतःच्या स्वार्थासाठी वर्षंनु वर्ष टिकवली मैत्री,नाती हे क्षणिक सुखासाठी तोडतात. आणि ते आपल्याला त्रास देऊन निघून जातात. अशांना आपण आपलं म्हणायचं का.? मुळीच नाही. अशा लोकांना त्यांनी केलेली चुकी लक्षात येत नसेल तरी त्या कामाची पोचपावती नक्कीच मिळते. या अशा अतिविश्वासू माणसांनीच जवळच्या लोकांना उध्वस्त केलेले असतं. असं इतिहास सांगतोय. कारण लांबची माणसं लाथ लागली तर पाया पडतात. पण अशा लोकांचं करायचं तरी काय त्यांना परत परत माफ करायचं का नाही नक्कीच नाही. त्यांना स्वतःपासून दूर केले बरं. मग तो किती जवळचा मित्र का असेना. अशांना जवळ करू नका. झालं तर त्यांना आपल्या आयुष्यातली काही जवळची माणसं महत्त्वाची असेल तर ती पण दान म्हणून किंवा आपल्या भाषेत भीक म्हणून देऊन टाका तेवढे त्यांच्या मनाला समाधान.!
        विश्वासाचे नातं खूप मोठ असतं आणि ते आयुष्यभर आपलं असतं. नावाला डिग्री लावण्या इतकही सोपं नसतं विश्वासाला नातं लावणं. ज्या वेळेत आपण एकटे असू त्यावेळेस ज्यांनी आपल्याला विचारलं त्यांना कधी विसरू नका. त्यांच्यासाठी कधी आपला वेळ बघूच नका, कारण ते आपले असतात आयुष्यात त्यांना जपा वेळेनुसार अस्तित्व बदलत, तसेच माणसे देखील बदलतात.जे आपल्यासाठी असतात ते एकमेव असतात, माणसांचे वाईट विचार माणसाला संपवत असतात, अनेकजण वाईट विचाराने वाईट बनले. जेवढा चांगला विचार आपल आयुष्य घडवतो तेवढाच वाईट विचार आपल्याला संपवतो, मानसिक तणाव आपली विचारांची पातळी संपून आपल्याला निरार्थक बनवतो. त्यामुळे त्यांनाच जपा जे आपल्या वाईट वेळेत आपल्याला समजवतात. समजून घेतात जगण्यास उत्सुक करतात.
        स्वतःच्या आयुष्याची किंमत स्वतः करायला शिका आपली किंमत त्यांना असते ते पण आपल्या सोबत गद्दार होऊ शकतात यामध्ये शंका नाही.
        आपल्या आयुष्यावर प्रेम करणारी नाही तर आपल्या विचारणावर प्रेम करणारी माणसे निर्माण करा. शेवटी तीच माणसं जगायला प्रभावी ठरेल. सूर्यास्त झाल्यानंतर, काही वेळेत सूर्योदय होतोच. तसेच वाईट वेळ गेली की चांगली वेळ नक्कीच येते, फक्त गरज असते ती नव्या विचारांचा उदय होण्याची. नवा विचारांचा उदय झाला की आपल्या समजेल की “आपलं असतं तरी कोण”… तर आयुष्यात वेळ आपली असते..!
        शेवटी आयुष्यात विश्वास कोणावर ठेवायचा हे शिका कारण आज मी जे काही इतरांसमोर मांडले, हे माझ्या अनुभवातून आहे. माझ्या आयुष्यात कसं माझ्या जवळच्याच मित्राने माझा पोपत बनवला. या साठी आहे. एका ताटात जेवणारे अस करू शकतात. तर दुसरे काय करतील असा प्रश्न निर्माण झाला तर उत्तर सोपं आहे. दूरचे लाथ लागली तर पाया पडतात. आणि ज्यांना आपण रक्ताच्या नात्या इतकं जवळच मानतो, भावा इतका विश्वास ठेवतो. तेच त्यांची लायकी दाखवतात. शेवटी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर माफ करा, पण जिवाभावाच्या माणसांनी आपल्याला मोठं केलं हे मी नक्कीच विसरणार नाही.

की आयुष्यात…
        सोसलं तर प्रॉब्लेम नाहीये
        खचल तर प्रॉब्लेम आहे
आणि आयुष्यात…
         जेवण असो का दुःख
          पचवतात आले पाहिजे…😃😅

•ज्ञानेश बुधवत
   दैनिक लोकनेता मुख्यसंपादक
   मातृतीर्थ_सिंदखेड राजा
    9960209149

____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!