May 9, 2024

उमेदीच्या काळात मेहनत करा – ठाणेदार केशव वाघ

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा :- कुठलेही ध्येय गाठायचे असल्यास संघर्ष करावा लागेल म्हणुन उमेदीच्या काळात मेहनत करून ध्येय गाठण्याचे आवाहन ठाणेदार केशव वाघ यांनी संत भगवान बाबा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
      सिंदखेडराजा शहरातील संत भगवान बाबा कला महाविद्यालयात सध्याच्या परिस्थितीत सुरू असलेल्या पोलीस भरती साठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व त्यांचा उत्साह वाढावा यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे उद्घाटन सिंदखेडराजा चे ठाणेदार केशव वाघ यांचे हस्ते करण्यात आले. सिंदखेड राजा नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सतीश तायडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर संस्थेचे अध्यक्ष भानुदास मुंढे, शिवसेना तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, पाणी पुरवठा सभापती बालाजी मेहेत्रे, उत्कर्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील सुरूले, नारायणराव नागरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय नागरे प्रमुख प्राचार्य किशोर वळसे यांच्या प्रमुख उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गोष्टीचे योग्य नियोजन केले पाहिजे तेव्हाच आपल्याला इच्छित ध्येय गाठल्या जाते असे सांगितले. तसेच या महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे असे सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये बुलढाणा, जालना आणि औंरगाबाद जिल्हयातील महाविद्यालयीन विद्यार्थी बहुसंख्येने या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, गोळा फेक मुले व मुली या गटात स्पर्धा घेण्यात आल्या. परीक्षक म्हणून देऊळगाव राजा येथील व्यंकटेश महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक डॉ. मोगरकर व नारायणराव नागरे महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक प्रा. वाघ, उत्कर्ष महाविद्यालयाचे प्रा. खरात यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत भगवान बाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किशोर वळसे, सुत्रसंचालन प्रा. निकाळजे तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक डॉ अविनाश खरात यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेचे काम पाहिले. या प्रसंगी दुसरबिड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे यांची संगाबा अमरावती विद्यापीठ प्राचार्य गटात सीनेट वर निवड झाल्या बद्दल आणि संत भगवान बाबा कला महाविद्यालय सिंदखेडराजा चे शारिरीक शिक्षण संचालक डॉ अविनाश खरात यांना गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त झाल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

चौकट :- संत भगवान बाबा महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश खरात यांनी पीएचडी मिळवली त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

उपसंपादक|ऋषिकेश जायभाये

____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!