May 9, 2024

महाराष्ट्र वैभव

लोकनेता न्युज नेटवर्क

मध्य महाराष्ट्रा वरती ।
सिंदखेड गांव आहे ।
बुलढाणा जिल्हा महाराष्ट्राची शान आहे ॥धृ॥

जिजाऊ संगे येथे / खेळले रमले शहाजी ।
रंग खेळता पंचमीला / नाते जुळले ।

भोसले घराण्यांची / जिजाऊं सुन आहे ॥ १ ॥

सिंदखेड नगरीला होती / चहूबाजूंनी तटबंदी ।
जाधव घराण्याची किर्ती नांदी

गावाच्या अवती भवती /
चांदणी तलाव आहे ॥ २ ॥

समाधी आहे इथे / लखुजी म्हाळसाईची |
किल्ल्यात जन्म भूमि / माता जिजाऊंची ।

बहुजन मराठ्याचे / बलस्थान आहे ॥ ३ ॥

गोल सजना बारव / वाडा उभा चिरेबंदी ।
मोती तलाव बाजूने / आश्रम ऋषि शरभंगी ।

पावन रंग महाल / वैभवाची साक्ष आहे ॥ ४ ॥

तो पहा रामेश्वर / लखुजी रावांनी केला जीर्णोद्धार ।
शिल्प अष्ठकोनी बारव ।

निळकंठेश्वर मंदीर / पावन माती आहे ॥

महाराष्ट्र मध्यावरती / सिंदखेड गांव आहे ।
बुलढाणा जिल्हा / महाराष्ट्राची शान आहे ॥

शाहीर मनोहर पवार
केळवदकर, ता . चिखली
जि . बुलढाणा .
मो .9850812651

__________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!