December 7, 2025

महंत नामदेव शास्त्रीजी यांचे मिरकाळा नगरीत जंगी स्वागत

इथून पुढे सप्ताह तरुणांनी पुढे होऊन करावा-नामदेव शास्त्री

लोकनेता न्युज नेटवर्क

गेवराई :- तालुक्यातील मिरकाळा गाव हे भगवान बाबांपासून भगवानगडाशी नाळ जोडलेले गाव आहे.जेवढे प्रेम ग्रामस्थांचे भगवान गडावर आहे तेवढेच प्रेम गडाचेही मिरकाळा गावावर आहे.त्यामुळे प्रत्येक वर्षी सप्ताहाला योग्य ते मार्गदर्शन मदत व समाप्तीच्या दिवशी महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे उपस्थिती असते.दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे भव्य मोटारसायकल रॅली व बॅन्ड पथकाने मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.तसेच मिरकाळा गावी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या सुमधुर किर्तनाने झाली.या बोलताना नामदेव महाराज शास्त्री असे म्हणाले की,मिरकाळा गावचा सप्ताह पुढच्या वर्षी फक्त तरुणांनी पुढे होऊन करावा.याचबरोबर शास्त्रीजींच्या दर्शनाचाही लाभ सर्व भाविक भक्तांनी घेतला आहे.लवकरच भगवान गडावरील ज्ञानेश्वर माउलींच्या भव्य मंदिराचे काम सुरू होणार असून वेळेत मंदिराचे काम पूर्ण होणार आहे अशी ग्वाही यावेळी बोलताना महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी दिली आहे. तसेच या मंदिराला आज पर्यंत सव्वा दोन कोटींचा दगड आणला असून संपूर्ण मंदिरासाठी दहा कोटींच्या आसपास खर्च लागणार आहे अशी माहिती यावेळी बोलताना महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी दिली आहे.

संपादक|ज्ञानेश्वर मुंढे

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author