May 19, 2024

चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याने नाव मिटत नसत – लोकनेता चे संपादक ज्ञानेश्वर बुधवत

महाराष्ट्र करतोय तरी काय;पर स्त्री ची अब्रू वाचवणारे शिवराय केवळ जयंती साजरी करण्यासाठीच का ?

लोकनेता न्युज नेटवर्क

        महाराष्ट्राची माय शिंधू माई सपकाळ यांच एक वाक्य आज आठवतय की “या महाराष्ट्रात मोठ होईच असेल तर अगोदर मरावं लागत” त्या शिवाय हा महाराष्ट्र कोणाला मोठ होऊ देत नाही ते नक्कीच…

            महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, येथे अनेक संत थोर महात्मे होऊन गेले. ज्यांची नावे आज आपण आदराने घेतो त्यांनी खूप संघर्ष करून समाजासाठी आपले योगदान दिले. छत्रपती शिवरायांनी स्वत:च राज्य (स्वराज) स्थापन केल, त्यामाघे राजमाता जिजाऊ ची प्रेरणा होती. आपल्या राज्यातील जनतेला कधीही कोणती हानी होणार नाही या साठी शिवरायांनी आपल आयुष्य अर्पण केल. आणि आज महाराष्ट्र करतो तरी काय ? हा प्रश्न निर्माण होत आहे. 

        गेल्या एक दोन वर्षा पासून अवघ्या महाराष्ट्रा मध्ये गौतमी पाटील ने आपल्या कलेतून सर्वांच्या मनामध्ये जागा निर्माण केली. तिच्या लावणी मुळे तिच्या वर अनेक वेळा टिका देखील झाली परंतु तिच्या कडून झालेल्या प्रकाराची तिने माफी देखील मघितली, अस असून तिच्या बद्दल काही जणांनी कट रचणे सोडले नाही. ४-५ दिवसा अगोदर तिचा एक विडियो सर्वत्र व्हाईरल झाला, विडियो व्हाईरल करणार्‍या निच वृतीच्या माणसाने काहीच विचार करता तो  विडियो व्हाईरल केला पण या गोष्टीमुळे एका कलाकारावर काय टिका होईल याची त्याला जाण नाही. ती महाराष्ट्राची लेक आहे, आणि तिला तिच्या कलेने मोठ केल कला हेच माणसाचं जीवन असत. महाराष्ट हा स्त्रीयांचा सन्मान करणारा आहे,पण आज महाराष्ट्राला लाभलेल्या वैभवाला हानी पोहचवत आहे. मराठी माणूस हा आपल्याच माणसाचे पाय ओढण्यातआपल समाधान मानतोय अस म्हणल तरी काही चुकीच नाही.

      सर्व सामान्य कुटुंबातील एका मुलीने आपल्या कलेच्या जोरावर आपल अस्तित्व निर्माण केल. अनेकांनी तिच्या कलेला उचलून धरलं पण काही नीच वृतीच्या माणसांनी तिला बदनाम करण सोडलं नाही “माणूस याने त्याने आटोक्यात नाही आला की लोक त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण सुरू करतात” असच गौतमी पाटीलच्या सोबत झाल. तीने केवळ आपली कला जगा समोर सादर केली. इतर अभिनेत्री सारखं तिने सोशल मीडियावर अंग प्रदर्शन केल नाही किंवा समाजात कोणत्याही प्रकारे छळ होईल अस कृत्य तिन केल नाही, आज आपण बघत असतो की इतर राज्यातील कलाकार कोणत्या प्रकारे जीवन जगतात, हरियाणा मधील सपना चौधरी आपल्या राज्यातील लोकांना तिच्या कळेच वेड लावून जाते ते महाराष्ट्राला जमत पण आपल्याच मराठी मुलीने पुढ गेलेलं आपल्याला खपवत नसेल तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे.

     प्रशंसा आली की टीका होतेच, महाराष्ट्र भूमी ही कलेवर प्रेम करणारी भूमी आहे. आपल्या मध्ये कोणती कला नसेल तर इतरांच्या कलेचा आदर करा, नाही मदत करता आली तरी चालेल पण आपल्याच माणसांचे पाय ओढण बंद करा, महाराष्ट्राला लागलेली किड म्हणजे आपले जवळचे माणसं आपल्याला गद्दार होणे. इतर राज्यातील मूल-मुली उच्च ठिकाणी जाऊन पोहचत आहे आणि आपण काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे हेच आपल्या लक्षात येत नाही.

     केवळ महाराष्ट्र नव्हे नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज या मातीत होऊन गेले ज्यांचे नाव आपण आदराने घेतो. जयंती मोठ्या उत्सवात सादर करतो. पण  छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जगत नाही केवळ एक नावाला जयंती म्हणून आपण जयंती करतो डीजे लावतो नाचतो बाकी आपण करतो तरी काय. शिवाजी महाराजाणं सारखी दाढी वाढवली किंवा गंद लावला म्हणजे शिवराय अमलनात आले अस होत का, त्यासाठी शिवरायांनी जसा पर स्त्रियांचं सुद्धा आदर केला तस आपल्याला वागाव लागेल (शत्रूच्या स्त्री ला देखील आदराने घरी नेऊन घाला ही शिवरायांची आपल्या सैनिकांना अदज्ञा असायची) आणि आपण करतोय काय आपल्याच महाराष्ट्रामधल्या गौतमी पाटील आपणच बदनाम कराव इतका निच महाराष्ट्र झालाय का. प्रत्येकाला जस जगण्याच स्वतंत्र आहे तसच प्रत्येक स्त्री ला देखील आहे. शून्यातून निर्माण केलेल्या विश्वाला संपण्याची भीती नसते. पण वाईट कृत्य करून कोणाला बदनाम केल्याने कोणी मोठ झालेल अजून मी तरी नाही बघितलं….

•ज्ञानेश बुधवत

 मुख्यसंपादक दैनिक लोकनेता

 मातृतीर्थसिंदखेड राजा

 9960209149

____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!