लोकनेता न्युज नेटवर्क
मुंबई :- उन्हाचा तडाखा वाढत असल्याने बुधवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात ७,३०ते११,३०यावेळेत भरणार आहेत. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा होईल आणि २ मेपासून उन्हाळा सुटी लागणार आहे. त्यात उन्हाळा व दिवाळी सुट्ट्यांचाही समावेश असतो.
आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. त्यानंतर १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला की दुसऱ्या दिवसापासून सर्वच शाळांना उन्हाळा सुटी असणार आहे. तत्पूर्वी, सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने दरवर्षीप्रमाणे १ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ बदलण्यात आली असून शाळा सकाळच्या सत्रात भरतील. उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वीच सर्व मुले घरी जातील, अशी शाळेची वेळ असणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यासंबंधीचे पत्र सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवले आहेत. उद्यापासून (बुधवार) शाळांना सुटी लागेपर्यंत शाळांची वेळ आता सकाळचीच असणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.
१२ जूनपासून सुरु होणार शाळा दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरवात साधारणतः: १५ जूनपासून शाळा सुरु होते. पण यंदा ११ जूनपर्यंतच उन्हाळा सुटी असणार आहे. त्यानंतर १२ जूनपासून सर्व शाळा सुरु होणार आहेत. २ मेपासून उन्हाळा सुटी उन्हाचा तडाखा वाढला असल्याने शाळांमधील चिमुकल्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून बुधवार सकाळच्या सत्रात भरतील. सकाळी साडेसात ते साडेअकरा अशी शाळेची वेळ असणार आहे. २ मे पासून जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांना उन्हाळा सुटी असेल.
प्रतिनिधी|विजय रोडे
___________________________________
zithromax 250mg ca – azithromycin 500mg sale buy nebivolol 20mg generic
order prednisolone 20mg for sale – azithromycin where to buy order progesterone 100mg online cheap
order neurontin 800mg sale – buy sporanox 100mg for sale order itraconazole 100 mg for sale
cost lasix 40mg – nootropil 800mg us order betamethasone 20gm generic
buy tizanidine generic – microzide pill hydrochlorothiazide pills
tadalafil 5mg pills – viagra sildenafil 100mg buy sildenafil 100mg without prescription
sildenafil mail order us – tadalafil 5mg uk buy tadalafil 20mg without prescription