May 9, 2024

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होवू नये म्हणून तापमानाची तीव्रता लक्षात घेऊन शाळेच्या वेळेत बदल !

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

मुंबई :- उन्हाचा तडाखा वाढत असल्याने बुधवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात ७,३०ते११,३०यावेळेत भरणार आहेत. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा होईल आणि २ मेपासून उन्हाळा सुटी लागणार आहे.  त्यात उन्हाळा व दिवाळी सुट्ट्यांचाही समावेश असतो.
      आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. त्यानंतर १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला की दुसऱ्या दिवसापासून सर्वच शाळांना उन्हाळा सुटी असणार आहे. तत्पूर्वी, सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने दरवर्षीप्रमाणे १ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ बदलण्यात आली असून शाळा सकाळच्या सत्रात भरतील. उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वीच सर्व मुले घरी जातील, अशी शाळेची वेळ असणार आहे.
       जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यासंबंधीचे पत्र सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवले आहेत. उद्यापासून (बुधवार) शाळांना सुटी लागेपर्यंत शाळांची वेळ आता सकाळचीच असणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.
      १२ जूनपासून सुरु होणार शाळा दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरवात साधारणतः: १५ जूनपासून शाळा सुरु होते. पण यंदा ११ जूनपर्यंतच उन्हाळा सुटी असणार आहे. त्यानंतर १२ जूनपासून सर्व शाळा सुरु होणार आहेत. २ मेपासून उन्हाळा सुटी उन्हाचा तडाखा वाढला असल्याने शाळांमधील चिमुकल्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून बुधवार सकाळच्या सत्रात भरतील. सकाळी साडेसात ते साडेअकरा अशी शाळेची वेळ असणार आहे. २ मे पासून जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांना उन्हाळा सुटी असेल.

प्रतिनिधी|विजय रोडे

___________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!